S M L

पत्रकारांचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही - निखिल वागळे

15 मे'पत्रकारांचा आवाज बंद केला जाऊ शकतो, अशा भ्रमात कुणी राहू नये असं परखड मत आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी व्यक्त केलं. बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने समाज विज्ञान कोशाचे जनक 'स.मा. गर्गे राज्यस्तरीय पुरस्कार' निखिल वागळे यांना देण्यात आला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निखिल वागळे यांनी पुरस्काराची एक लाख रुपयाची रक्कम सिंधुताईंच्या संस्थेला देणगी म्हणून दिली. मराठीतील पहिल्या समाज विज्ञान कोशाची निर्मिती गर्गे यांनी केली. त्यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. समाज विज्ञान कोशा सोबतच गर्गे यांनी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात राहून शिक्षण घेता यावं यासाठी पुण्यात मराठवाडा मित्र मंडळाचीही स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलंय. या कार्यक्रमाला सर्वपक्षिय नेते उपस्थित होते. यावेळी निखिल वागळे यांनी आपल्या भाषणात माफियाराजवर टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 06:11 PM IST

पत्रकारांचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही - निखिल वागळे

15 मे

'पत्रकारांचा आवाज बंद केला जाऊ शकतो, अशा भ्रमात कुणी राहू नये असं परखड मत आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी व्यक्त केलं.

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने समाज विज्ञान कोशाचे जनक 'स.मा. गर्गे राज्यस्तरीय पुरस्कार' निखिल वागळे यांना देण्यात आला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निखिल वागळे यांनी पुरस्काराची एक लाख रुपयाची रक्कम सिंधुताईंच्या संस्थेला देणगी म्हणून दिली. मराठीतील पहिल्या समाज विज्ञान कोशाची निर्मिती गर्गे यांनी केली.

त्यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. समाज विज्ञान कोशा सोबतच गर्गे यांनी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात राहून शिक्षण घेता यावं यासाठी पुण्यात मराठवाडा मित्र मंडळाचीही स्थापना केली.

या मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलंय. या कार्यक्रमाला सर्वपक्षिय नेते उपस्थित होते. यावेळी निखिल वागळे यांनी आपल्या भाषणात माफियाराजवर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close