S M L

मुख्यमंत्रीपदी तिसर्‍यांदा जयललिता विराजमान

16 मेजयललिता यांनी आज तिसर्‍यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या बरोबर 33 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या शपथविधी कार्यक्रमाला, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए.बी.बर्धन, डी.राजा उपस्थित होते. 1981 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेल्या जयललिता यांनी या निवडणुकीत करूणानिधी यांच्या द्रमुकचा दारूण पराभव करत सत्ता हस्तगत केली. 1991 मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि करूणानिधी यांची कौटुंबिक घराणेशाही या मुद्यांवर जयललिता यांनी निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी त्या विजयीही झाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 09:47 AM IST

मुख्यमंत्रीपदी तिसर्‍यांदा जयललिता विराजमान

16 मे

जयललिता यांनी आज तिसर्‍यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या बरोबर 33 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या शपथविधी कार्यक्रमाला, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए.बी.बर्धन, डी.राजा उपस्थित होते.

1981 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेल्या जयललिता यांनी या निवडणुकीत करूणानिधी यांच्या द्रमुकचा दारूण पराभव करत सत्ता हस्तगत केली. 1991 मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि करूणानिधी यांची कौटुंबिक घराणेशाही या मुद्यांवर जयललिता यांनी निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी त्या विजयीही झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close