S M L

भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका !

29 मेपुणे शहर अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका उडाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला डावललं गेलं म्हणून भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहेत.पुणे शहराच्या अध्यक्षपदी विकास मठकरी यांना निवडल्याचे जाहीर झालं तेव्हाच यात शिजलेल्या राजकारणाचे पडसाद उमटणार हे स्पष्ट झालं. पुण्याचा प्रमुख कोण हे ठरवण्यासाठी भाजपमध्ये गेले तीन महिने खल सुरु होता. राज्यातला कुठलाच नेता या निवडीसाठी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी मान्य केला नाही. तेव्हा भाजपने राज्याचे निरीक्षक व्यंकय्या नायडू यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. पण अध्यक्षपदासाठी मठकरी यांचं नाव जाहीर करताना नायडूंचं मत विचारात घेतलं गेलंच नाही असा आरोप आता मुंडे समर्थक गोगावले यांनी केला. गोगावले हे गोपीनाथ मुंडे यांचे पुण्यातील खास कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे गोगावलेंना डावलण्यातला अर्थ मुं़डेंनी ओळखला. शिवशक्ती - भीमशक्तीच्या मेळाव्याला न जाता त्यांनी आपली नाराजी नोंदवली. त्यामुळेच मुंडेविरोधी गटाला अखेर पुण्यात सारवासारव करावी लागली. विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या कोणतीही नाराजी नाही. गोपीनाथ मुंडे एका कार्यक्रमासाठी शहराच्या बाहेर होतं असं स्पष्ट केलं. पण, तावडेंचा हा खुलासा तकलादू आहे हे खुद्द मुंडेंच्याच बोलण्यातून पुढं आलं. काहीच बोलायचं नाही असं सांगताना मुंडे पुणे प्रकरणात आपण नाराज आहोत हेच बोलून गेले.तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या अध्यक्षपदी आपल्या कार्यकर्त्याला डावललं गेलं तेव्हा मुंडे संतापले होते. त्यांनी राजीनामा देत बंडाची हूल उठवली होती. पण यावेळी मुंडे खूपच गप्प राहिलेत. आणि हेच भाजपसाठी अधिक चिंताजनक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 04:06 PM IST

भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका !

29 मे

पुणे शहर अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका उडाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला डावललं गेलं म्हणून भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहेत.

पुणे शहराच्या अध्यक्षपदी विकास मठकरी यांना निवडल्याचे जाहीर झालं तेव्हाच यात शिजलेल्या राजकारणाचे पडसाद उमटणार हे स्पष्ट झालं. पुण्याचा प्रमुख कोण हे ठरवण्यासाठी भाजपमध्ये गेले तीन महिने खल सुरु होता.

राज्यातला कुठलाच नेता या निवडीसाठी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी मान्य केला नाही. तेव्हा भाजपने राज्याचे निरीक्षक व्यंकय्या नायडू यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. पण अध्यक्षपदासाठी मठकरी यांचं नाव जाहीर करताना नायडूंचं मत विचारात घेतलं गेलंच नाही असा आरोप आता मुंडे समर्थक गोगावले यांनी केला.

गोगावले हे गोपीनाथ मुंडे यांचे पुण्यातील खास कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे गोगावलेंना डावलण्यातला अर्थ मुं़डेंनी ओळखला. शिवशक्ती - भीमशक्तीच्या मेळाव्याला न जाता त्यांनी आपली नाराजी नोंदवली. त्यामुळेच मुंडेविरोधी गटाला अखेर पुण्यात सारवासारव करावी लागली. विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या कोणतीही नाराजी नाही. गोपीनाथ मुंडे एका कार्यक्रमासाठी शहराच्या बाहेर होतं असं स्पष्ट केलं. पण, तावडेंचा हा खुलासा तकलादू आहे हे खुद्द मुंडेंच्याच बोलण्यातून पुढं आलं. काहीच बोलायचं नाही असं सांगताना मुंडे पुणे प्रकरणात आपण नाराज आहोत हेच बोलून गेले.

तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या अध्यक्षपदी आपल्या कार्यकर्त्याला डावललं गेलं तेव्हा मुंडे संतापले होते. त्यांनी राजीनामा देत बंडाची हूल उठवली होती. पण यावेळी मुंडे खूपच गप्प राहिलेत. आणि हेच भाजपसाठी अधिक चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close