S M L

सोनवणे जळीतकांडाचे पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांवर संशय

01 जूनअपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कोणी जाळलं याचं उत्तर सोपं होतं. मुळ मुद्दा होता तो सोनवणे यांना का जाळलं हा पोलिसांचा तपास या दिशेनं होणं अभिप्रेत होतं. पण यात स्वत:च अडकल्याने पोलिसांनी पुरावे शोधण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचे काम केलं असा आरोप मनमाडकरांनी केला आहे.अवैध धंद्यांवरच्या सरकारी धाडी, धंदे रोखण्याच्या नाहीत तर हप्ते वाढवून घेण्याचे माध्यम बनल्यात. मनमाडमधील तेलकंपन्यांचे डेपो म्हणजे या हफ्तेबाज सरकारी अधिकार्‍यांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी. पुरवठा, महसूल, पोलीस आणि तेलकंपन्या सगळेच अधिकारी यात सामील आहे.पोपट शिंदेचा मित्र देवेंद्र अडसुळ म्हणतात, साधरणतहा हप्ता दीड ते दोन लाख इतका असतो. कधीकधी तहसीलदार, प्रांत, डीएसओ स्वत: यायचे आणि रेड मारायचे. पण तोडीपाणी करून 40 हजार रुपये घेवून जायचे.पोपट शिंदेचा भेसळीचा अड्डाही याला अपवाद नव्हता. ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाभाऊ त्रिभुवन म्हणतात, पोपट शिंदे आणि सोनवणे यांचे देवाणघेवाणीचे संबंध अवैध धंद्यातीलच होते. पोपट शिंदेचा धंदा महसूल आणि पोलिसांच्या संगनमताने सुरू होता.सोनवणे जळीतकांडामागचं हे मुख्य कारण. जळीतकांडाच्या 6 महिन्यांपूर्वीच यशवंत सोनवणे यांनी तेल भेसळ करणारा पोपटचा टँकर पकडला होता. यावर देवेंद्र अडसूळे म्हणतात, टँकर सोडवण्यासाठी यशवंत सोनवणेंनी पोपट शिंदेकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. आम्ही दुसर्‍या दिवशी ऍण्टी करप्शनकडे गेलो. आमची रितसर तक्रार 27/8/2010 ला घेतली. ट्रॅप दुसर्‍यादिवशी लावला. यासाठी पोपटला शर्ट दिला होता त्यात एक छुपा कॅमेरा होता. काळेनं सांगितलं भुजबळ साहेबांचचा दौरा आहे साहेब येणार नाहीत. ट्रॅप फेल गेलाय असं ऍण्टी करप्शनच्या लोकांनी सांगितलं.मनमाडचा प्रत्येक माणूस एकच सांगतो, पोपट शिंदेच्या कार्यक्रमांमध्ये महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असायचे. अशा चित्रफिती होत्या, फोटो होते. पण जेव्हा जळीतकांडाचे प्रकरण घडलं त्यावेळी पोलीस डिपार्टमेंटने पुरावे- फोटो, सीडी फोटोग्राफरकडून घेवूनही नेस्तनाबूत केले.म्हणूनच पोपटती मृत्यूपूर्व जबानी खूप महत्त्वाची होती, ऍड किशोर सोनवणे म्हणतात, पोपट शिंदे 5/6 दिवस हॉस्पिटलमध्ये होता हा कालावधी पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी पुरेसा होता. या कालावधीत त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला नाही त्याचा काही खुलासाही केला नाही.पोलीस नाही तरी आता सीबीआय चौकशीततरी याचा तपास होईल अशी आशा मनमाडकरांना होती. पण चार्टशीटला होणार्‍या विलंबामुळे तीही मावळून गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 12:53 PM IST

सोनवणे जळीतकांडाचे पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांवर संशय

01 जून

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कोणी जाळलं याचं उत्तर सोपं होतं. मुळ मुद्दा होता तो सोनवणे यांना का जाळलं हा पोलिसांचा तपास या दिशेनं होणं अभिप्रेत होतं. पण यात स्वत:च अडकल्याने पोलिसांनी पुरावे शोधण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचे काम केलं असा आरोप मनमाडकरांनी केला आहे.

अवैध धंद्यांवरच्या सरकारी धाडी, धंदे रोखण्याच्या नाहीत तर हप्ते वाढवून घेण्याचे माध्यम बनल्यात. मनमाडमधील तेलकंपन्यांचे डेपो म्हणजे या हफ्तेबाज सरकारी अधिकार्‍यांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी. पुरवठा, महसूल, पोलीस आणि तेलकंपन्या सगळेच अधिकारी यात सामील आहे.

पोपट शिंदेचा मित्र देवेंद्र अडसुळ म्हणतात, साधरणतहा हप्ता दीड ते दोन लाख इतका असतो. कधीकधी तहसीलदार, प्रांत, डीएसओ स्वत: यायचे आणि रेड मारायचे. पण तोडीपाणी करून 40 हजार रुपये घेवून जायचे.

पोपट शिंदेचा भेसळीचा अड्डाही याला अपवाद नव्हता. ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाभाऊ त्रिभुवन म्हणतात, पोपट शिंदे आणि सोनवणे यांचे देवाणघेवाणीचे संबंध अवैध धंद्यातीलच होते. पोपट शिंदेचा धंदा महसूल आणि पोलिसांच्या संगनमताने सुरू होता.

सोनवणे जळीतकांडामागचं हे मुख्य कारण. जळीतकांडाच्या 6 महिन्यांपूर्वीच यशवंत सोनवणे यांनी तेल भेसळ करणारा पोपटचा टँकर पकडला होता. यावर देवेंद्र अडसूळे म्हणतात, टँकर सोडवण्यासाठी यशवंत सोनवणेंनी पोपट शिंदेकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. आम्ही दुसर्‍या दिवशी ऍण्टी करप्शनकडे गेलो.

आमची रितसर तक्रार 27/8/2010 ला घेतली. ट्रॅप दुसर्‍यादिवशी लावला. यासाठी पोपटला शर्ट दिला होता त्यात एक छुपा कॅमेरा होता. काळेनं सांगितलं भुजबळ साहेबांचचा दौरा आहे साहेब येणार नाहीत. ट्रॅप फेल गेलाय असं ऍण्टी करप्शनच्या लोकांनी सांगितलं.

मनमाडचा प्रत्येक माणूस एकच सांगतो, पोपट शिंदेच्या कार्यक्रमांमध्ये महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असायचे. अशा चित्रफिती होत्या, फोटो होते. पण जेव्हा जळीतकांडाचे प्रकरण घडलं त्यावेळी पोलीस डिपार्टमेंटने पुरावे- फोटो, सीडी फोटोग्राफरकडून घेवूनही नेस्तनाबूत केले.म्हणूनच पोपटती मृत्यूपूर्व जबानी खूप महत्त्वाची होती, ऍड किशोर सोनवणे म्हणतात, पोपट शिंदे 5/6 दिवस हॉस्पिटलमध्ये होता हा कालावधी पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी पुरेसा होता. या कालावधीत त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला नाही त्याचा काही खुलासाही केला नाही.

पोलीस नाही तरी आता सीबीआय चौकशीततरी याचा तपास होईल अशी आशा मनमाडकरांना होती. पण चार्टशीटला होणार्‍या विलंबामुळे तीही मावळून गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close