S M L

सक्षम लोकपाल विधेयकाची गरज !

03 जुलैलोकपाल विधेयकावर एकमत बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. 3 तास चाललेल्या या बैठकीला सत्ताधारी यूपीएचे सर्व घटक पक्ष हजर होते. डाव्या आघाडीचे नेते, एनडीएचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीत फारसं काही निष्पन्न झालं नाही.देशाला सक्षम लोकपाल विधेयकाची गरज आहे असा एका ओळीचा ठराव मात्र संमत झाला. विरोधी पक्षाने सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढत लोकपाल विधेयकासाठी 2 मसुदे का तयार केले. याचा जाब विचारला. सरकारने लोकपाल विधेयकाबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी अशी मागणीही विरोधी पक्षाने केली आहेत. दरम्यान, लोकपाल विधेयकाच्या बैठकीला शिवसेना वगळता सर्व महत्त्वाचे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. लोकपाल विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. पण अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकार आणि नागरी समितीमध्ये मतभेत कायम राहिले. म्हणूनच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. तर धर्मनिर्पेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा यांनीही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला येऊ शकले नाही.कुणाची भूमिका काय ?काँग्रेस - पंतप्रधान, न्यायपालिका लोकपालच्या अखत्यारीत नकोद्रमुक - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवेडावे पक्ष - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवेतेलुगू देसम - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवे, पण न्यायपालिका नकोभाजप - सशक्त लोकपाल हवा, पण पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर मौनशिवसेना - अण्णांना विरोध, लोकपाल बैठकांवर बहिष्कारराजद - अण्णांच्या नागरी समितीला पूर्णतः विरोधजदयू - अण्णांना पाठिंबा, बिहारमध्ये जन लोकायुक्त विधेयक आणणारबसप - भूमिका गुलदस्त्यातबैठक पूर्ण झाल्यावरच बोलणार - अण्णा हजारे दरम्यान सर्वपक्षीय बैठक सध्या तरी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बैठक पूर्ण झाल्यावरच प्रतिक्रिया देऊ असं अण्णा हजारेंनी म्हंटलं आहे. पण लोकपाल विधेयकाचे दोन मसुदे का यावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारला. यावर अण्णांनी समाधान व्यक्त केलं. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक येथे दिलेल्या आवाहनालाही अण्णांनी उत्तर दिलं. भ्रष्टाचाराविरोधात येणार्‍या सर्वांबरोबर काम करायला आपण तयार असल्याचे अण्णांनी म्हंटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 05:28 PM IST

सक्षम लोकपाल विधेयकाची गरज !

03 जुलै

लोकपाल विधेयकावर एकमत बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. 3 तास चाललेल्या या बैठकीला सत्ताधारी यूपीएचे सर्व घटक पक्ष हजर होते. डाव्या आघाडीचे नेते, एनडीएचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीत फारसं काही निष्पन्न झालं नाही.देशाला सक्षम लोकपाल विधेयकाची गरज आहे असा एका ओळीचा ठराव मात्र संमत झाला.

विरोधी पक्षाने सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढत लोकपाल विधेयकासाठी 2 मसुदे का तयार केले. याचा जाब विचारला. सरकारने लोकपाल विधेयकाबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी अशी मागणीही विरोधी पक्षाने केली आहेत.

दरम्यान, लोकपाल विधेयकाच्या बैठकीला शिवसेना वगळता सर्व महत्त्वाचे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. लोकपाल विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. पण अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकार आणि नागरी समितीमध्ये मतभेत कायम राहिले. म्हणूनच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. तर धर्मनिर्पेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा यांनीही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला येऊ शकले नाही.

कुणाची भूमिका काय ?

काँग्रेस - पंतप्रधान, न्यायपालिका लोकपालच्या अखत्यारीत नकोद्रमुक - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवेडावे पक्ष - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवेतेलुगू देसम - पंतप्रधान लोकपालच्या अखत्यारीत हवे, पण न्यायपालिका नकोभाजप - सशक्त लोकपाल हवा, पण पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर मौनशिवसेना - अण्णांना विरोध, लोकपाल बैठकांवर बहिष्कारराजद - अण्णांच्या नागरी समितीला पूर्णतः विरोधजदयू - अण्णांना पाठिंबा, बिहारमध्ये जन लोकायुक्त विधेयक आणणारबसप - भूमिका गुलदस्त्यात

बैठक पूर्ण झाल्यावरच बोलणार - अण्णा हजारे

दरम्यान सर्वपक्षीय बैठक सध्या तरी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बैठक पूर्ण झाल्यावरच प्रतिक्रिया देऊ असं अण्णा हजारेंनी म्हंटलं आहे. पण लोकपाल विधेयकाचे दोन मसुदे का यावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारला. यावर अण्णांनी समाधान व्यक्त केलं. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक येथे दिलेल्या आवाहनालाही अण्णांनी उत्तर दिलं. भ्रष्टाचाराविरोधात येणार्‍या सर्वांबरोबर काम करायला आपण तयार असल्याचे अण्णांनी म्हंटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close