S M L

माळीनगरला सजला तुकोबांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा

07 जुलैमाळीनगरला आज तुकोबांच्या पालखी सोहळा सजला तो बहारदार उभ्या रिंगण कार्यक्रमाने. मानाच्या अश्वाच्या फेरीआधी वारकर्‍यांनी धमाल खेळ रंगवले. फुगड्या, नाच याबरोबरच टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी पाहून भाविकही हरखून गेले होते. त्यानंतर तुकोबारायांचा मानाचा अश्व धावला तो दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो वारकर्‍यांमधून. त्यावेळी अश्वखुराने उखडलेली माती कपाळी लावण्यासाठी वारकर्‍यांची एकच गर्दी उडाली. त्यानंतर मग निशाण आणि जरी पटका घेतलेल्या अश्‍वाची रिंगणातून धाव झाली. त्यावेळीही वारकर्‍यांनी एकच जल्लोष केला. अश्वांच्या दौडीनंतरही वारकर्‍यांचे खेळ रंगले. माळीनगरचा हा सोहळा गावकर्‍यांनाही चांगलाच सुखावून गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 02:34 PM IST

माळीनगरला सजला तुकोबांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा

07 जुलै

माळीनगरला आज तुकोबांच्या पालखी सोहळा सजला तो बहारदार उभ्या रिंगण कार्यक्रमाने. मानाच्या अश्वाच्या फेरीआधी वारकर्‍यांनी धमाल खेळ रंगवले. फुगड्या, नाच याबरोबरच टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी पाहून भाविकही हरखून गेले होते.

त्यानंतर तुकोबारायांचा मानाचा अश्व धावला तो दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो वारकर्‍यांमधून. त्यावेळी अश्वखुराने उखडलेली माती कपाळी लावण्यासाठी वारकर्‍यांची एकच गर्दी उडाली.

त्यानंतर मग निशाण आणि जरी पटका घेतलेल्या अश्‍वाची रिंगणातून धाव झाली. त्यावेळीही वारकर्‍यांनी एकच जल्लोष केला. अश्वांच्या दौडीनंतरही वारकर्‍यांचे खेळ रंगले. माळीनगरचा हा सोहळा गावकर्‍यांनाही चांगलाच सुखावून गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close