S M L

खासदारांच्या विकास निधीत घसघशीत वाढ

07 जुलैमंत्रिमंडळाने खासदारांच्या विकास निधीत तब्बल 3 कोटी रुपये इतकी घसघशीत वाढ केली आहेत. खासदारांचा वार्षिक विकास निधी आता 2 कोटी रुपयावरुन 5 कोटी एवढा करण्यात आला आहेत. याच वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून हा वाढीव निधी मिळणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 2 हजार 370 कोटी रुपयांचा जादा बोजा पडणार आहे. या निधीच्या खर्चात संबंधित मतदारसंघातल्या पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक विकास निधीत वाढ करावी, अशी मागणी सर्व पक्षाचे खासदार वारंवार करत होते. महागाई वाढतेय आणि त्याचा परिणाम विकास योजनांवर होतोय. त्यामुळेच ही वाढ करण्याचा निर्णय घेतला असं माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितलंय. हा निधी कसा खर्च होतो यावर लक्ष ठेवले जाईल यावर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंंत्रालय लक्ष ठेवेल असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 05:41 PM IST

खासदारांच्या विकास निधीत घसघशीत वाढ

07 जुलै

मंत्रिमंडळाने खासदारांच्या विकास निधीत तब्बल 3 कोटी रुपये इतकी घसघशीत वाढ केली आहेत. खासदारांचा वार्षिक विकास निधी आता 2 कोटी रुपयावरुन 5 कोटी एवढा करण्यात आला आहेत. याच वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून हा वाढीव निधी मिळणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 2 हजार 370 कोटी रुपयांचा जादा बोजा पडणार आहे.

या निधीच्या खर्चात संबंधित मतदारसंघातल्या पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक विकास निधीत वाढ करावी, अशी मागणी सर्व पक्षाचे खासदार वारंवार करत होते. महागाई वाढतेय आणि त्याचा परिणाम विकास योजनांवर होतोय.

त्यामुळेच ही वाढ करण्याचा निर्णय घेतला असं माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितलंय. हा निधी कसा खर्च होतो यावर लक्ष ठेवले जाईल यावर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंंत्रालय लक्ष ठेवेल असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close