S M L

विलासराव आणि जयराम रमेश यांचे खाते बदलले

12 जुलैपंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमधील नव्या मंत्र्यांचा आज संध्याकाळी शपथविधी झाला. 13 पैकी 11 मंत्र्यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शपथ दिली. पण महाराष्ट्रासाठी या मंत्रिमंडळ फेरबदलातून तीन महत्वाचे बदल समोर आले आहेत. विलासराव देशमुखाकडून ग्रामविकास मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे तुलनेनं कमी महत्वाचे असं विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर मुरली देवरांच्या जागी, मिलिंद देवरांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मिलिंद देवरा आता सूचना आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री असतीलपहिल्यांदा 4 कॅबिनेट मंत्र्याचा शपथ झाला. सुरुवातीला व्ही. किशोरचंद्र देव, बेनिप्रसाद वर्मा, दिनेश त्रिवेदी, जयराम रमेश यांचा शपथविधी झाला. त्यानंतर स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. जयंती नटराजन, पवनसिंग घटोवार, सुदीप बंडोपाध्याय यांनी शपथ घेतली. सर्वात शेवटी राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. चरणदास महंत, जितेंद्र सिंग, मिलिंद देवरा आणि शेवटी राजीव शुक्ला यांनी शपथ घेतली. गुरुदास कामत आणि श्रीकांत जेना या दोन मंत्र्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. द्रमुकच्या एकाही मंत्र्याने आज शपथ घेतली नाही.द्रमुकच्या दोन रिकाम्या जागा तशाच ठेवण्यात आल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. देशहित समोर ठेवून हा फेरबदल केल्याचे त्यांनी सांगितले. 6 मंत्र्यांना त्यांनी डच्चू दिला. 7 नव्या चेहर्‍यांना संधी दिली. तीन मंत्र्यांचा दर्जा वाढवला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडचे दूरसंचार आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय कायम राहिलं आहे. तरूणांना संधी हवेतच गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या चार महत्त्वाच्या खात्यांना पंतप्रधानांनी धक्का लावला नाही. तसेच या फेरबदलात तरुणांना संधी मिळेल असं वाटत होतं. पण 34 वर्षांचे मिलिंद देवरा आणि 40 वर्षांचे जितेंद्र सिंग वगळता दुसरा एकही तरुण चेहरा घेण्यात आलेला नाही. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय अजूनही 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. कॅबिनेटमधील 14 मंत्री त्यांच्या सत्तरीत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचे वय 79 वर्षं आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वय 78 वर्षं आहे.ममता दीदींच्या पक्षातील दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्रीतृणमूल काँग्रेसकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्याचे धाडस पंतप्रधानांनी दाखवले नाही. रेल्वेला आता पूर्णवेळ मंत्री मिळाला आहे. पण आपल्याच पक्षाकडे रेल्वे मंत्रालय राहील अशी काळजी ममता बॅनर्जी यांनी घेतली. तृणमूलचे दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेटपदी बढती देऊन त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आलं. ममता बॅनजीर्ंनी राजीनामा दिल्यानंतर रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांकडे होतं. तृणमूलचे मुकूल रॉय रेल्वे राज्यमंत्री होते. आता मुकूल रॉय यांना शिपिंग मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. तर, दिनेश त्रिवेदी यांच्याकडे रेल्वे मंत्रालय देण्यात आलं.कुणाचं पद गेलं?मुरली देवरा - कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री- काँग्रेसबी. के. हांडिक - ईशान्य भारत विकास मंत्री - काँग्रेसएम. एस. गिल - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी - काँग्रेसकांतिलाल भुरिया - आदिवासी विकास मंत्री - काँग्रेसए. साई प्रताप - अवजड उद्योग राज्यमंत्री - काँग्रेस अरुण एस. यादव - कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री - काँग्रेसमंत्रिमंडळातील नवे चेहरे मिलिंद देवरा - राज्यमंत्री- सूचना आणि माहिती तंत्रज्ञानजयंती नटराजन- राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)- पर्यावरण आणि वनमंत्री सुदीप बंदोपाध्याय - राज्यमंत्री- आरोग्य आणि कुटुंब कल्याणचरणदास महंत - राज्यमंत्री - कृषी आणि अन्नप्रक्रिया जितेंद्र सिंग- राज्यमंत्री - गृहराज्यमंत्री राजीव शुक्ला - राज्यमंत्री - संसदीय कामकाज व्ही. किशोरचंद्र देव - कॅबिनेट- आदिवासी कल्याणकुणाला बढती मिळाली ?जयराम रमेश पूर्वी - पर्यावरण राज्यमंत्री आता - ग्रामविकास ( कॅबिनेट)दिनेश त्रिवेदी - पूर्वी - आरोग्य राज्यमंत्री - आता - रेल्वेमंत्री (कॅबिनेट)बेनीप्रसाद वर्मा - पूर्वी - पोलाद राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार)- आता - पोलाद राज्यमंत्री ( कॅबिनेट)कुणाचं खातं बदललं ?विलासराव देशमुख पूर्वी - ग्रामविकास आणि पंचायती राज्य आता - विज्ञान-तंत्रज्ञान वीरप्पा मोईली पूर्वी - कायदामंत्री आता - कॉर्पोरेट अफेअर्स पवनकुमार बन्सल पूर्वी - संसदीय कामकाज, विज्ञान-तंत्रज्ञानआता - संसदीय कामकाज, जलस्रोत सलमान खुर्शीद पूर्वी - अल्पसंख्याक कल्याणआता - कायदा, अल्पसंख्याक कल्याण

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2011 09:38 AM IST

विलासराव आणि जयराम रमेश यांचे खाते बदलले

12 जुलै

पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमधील नव्या मंत्र्यांचा आज संध्याकाळी शपथविधी झाला. 13 पैकी 11 मंत्र्यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शपथ दिली. पण महाराष्ट्रासाठी या मंत्रिमंडळ फेरबदलातून तीन महत्वाचे बदल समोर आले आहेत. विलासराव देशमुखाकडून ग्रामविकास मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे तुलनेनं कमी महत्वाचे असं विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर मुरली देवरांच्या जागी, मिलिंद देवरांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मिलिंद देवरा आता सूचना आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री असतील

पहिल्यांदा 4 कॅबिनेट मंत्र्याचा शपथ झाला. सुरुवातीला व्ही. किशोरचंद्र देव, बेनिप्रसाद वर्मा, दिनेश त्रिवेदी, जयराम रमेश यांचा शपथविधी झाला. त्यानंतर स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. जयंती नटराजन, पवनसिंग घटोवार, सुदीप बंडोपाध्याय यांनी शपथ घेतली. सर्वात शेवटी राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. चरणदास महंत, जितेंद्र सिंग, मिलिंद देवरा आणि शेवटी राजीव शुक्ला यांनी शपथ घेतली.

गुरुदास कामत आणि श्रीकांत जेना या दोन मंत्र्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. द्रमुकच्या एकाही मंत्र्याने आज शपथ घेतली नाही.द्रमुकच्या दोन रिकाम्या जागा तशाच ठेवण्यात आल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. देशहित समोर ठेवून हा फेरबदल केल्याचे त्यांनी सांगितले. 6 मंत्र्यांना त्यांनी डच्चू दिला. 7 नव्या चेहर्‍यांना संधी दिली. तीन मंत्र्यांचा दर्जा वाढवला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडचे दूरसंचार आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय कायम राहिलं आहे.

तरूणांना संधी हवेतच

गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या चार महत्त्वाच्या खात्यांना पंतप्रधानांनी धक्का लावला नाही. तसेच या फेरबदलात तरुणांना संधी मिळेल असं वाटत होतं. पण 34 वर्षांचे मिलिंद देवरा आणि 40 वर्षांचे जितेंद्र सिंग वगळता दुसरा एकही तरुण चेहरा घेण्यात आलेला नाही. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय अजूनही 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. कॅबिनेटमधील 14 मंत्री त्यांच्या सत्तरीत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचे वय 79 वर्षं आहे. त्यापाठोपाठ पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वय 78 वर्षं आहे.

ममता दीदींच्या पक्षातील दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्री

तृणमूल काँग्रेसकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्याचे धाडस पंतप्रधानांनी दाखवले नाही. रेल्वेला आता पूर्णवेळ मंत्री मिळाला आहे. पण आपल्याच पक्षाकडे रेल्वे मंत्रालय राहील अशी काळजी ममता बॅनर्जी यांनी घेतली. तृणमूलचे दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेटपदी बढती देऊन त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आलं. ममता बॅनजीर्ंनी राजीनामा दिल्यानंतर रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांकडे होतं. तृणमूलचे मुकूल रॉय रेल्वे राज्यमंत्री होते. आता मुकूल रॉय यांना शिपिंग मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. तर, दिनेश त्रिवेदी यांच्याकडे रेल्वे मंत्रालय देण्यात आलं.

कुणाचं पद गेलं?

मुरली देवरा - कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री- काँग्रेस

बी. के. हांडिक - ईशान्य भारत विकास मंत्री - काँग्रेस

एम. एस. गिल - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी - काँग्रेस

कांतिलाल भुरिया - आदिवासी विकास मंत्री - काँग्रेस

ए. साई प्रताप - अवजड उद्योग राज्यमंत्री - काँग्रेस

अरुण एस. यादव - कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री - काँग्रेस

मंत्रिमंडळातील नवे चेहरे

मिलिंद देवरा - राज्यमंत्री- सूचना आणि माहिती तंत्रज्ञान

जयंती नटराजन- राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)- पर्यावरण आणि वनमंत्री

सुदीप बंदोपाध्याय - राज्यमंत्री- आरोग्य आणि कुटुंब कल्याण

चरणदास महंत - राज्यमंत्री - कृषी आणि अन्नप्रक्रिया

जितेंद्र सिंग- राज्यमंत्री - गृहराज्यमंत्री

राजीव शुक्ला - राज्यमंत्री - संसदीय कामकाज

व्ही. किशोरचंद्र देव - कॅबिनेट- आदिवासी कल्याण

कुणाला बढती मिळाली ?

जयराम रमेश पूर्वी - पर्यावरण राज्यमंत्री आता - ग्रामविकास ( कॅबिनेट)

दिनेश त्रिवेदी - पूर्वी - आरोग्य राज्यमंत्री - आता - रेल्वेमंत्री (कॅबिनेट)

बेनीप्रसाद वर्मा - पूर्वी - पोलाद राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार)- आता - पोलाद राज्यमंत्री ( कॅबिनेट)

कुणाचं खातं बदललं ?

विलासराव देशमुख पूर्वी - ग्रामविकास आणि पंचायती राज्य आता - विज्ञान-तंत्रज्ञान

वीरप्पा मोईली पूर्वी - कायदामंत्री आता - कॉर्पोरेट अफेअर्स

पवनकुमार बन्सल पूर्वी - संसदीय कामकाज, विज्ञान-तंत्रज्ञानआता - संसदीय कामकाज, जलस्रोत

सलमान खुर्शीद पूर्वी - अल्पसंख्याक कल्याणआता - कायदा, अल्पसंख्याक कल्याण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close