S M L

सिध्दार्थ आणि रवी जाधव यांना शाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार

18 जुलैसध्याचा आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि नटरंग आणि बालगंधर्व असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक रवी जाधव यांना नुकतंच शाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आलं. ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे आणि निर्माता- दिग्दर्शक प्रकाश भेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गायक संगीतकार नंदेश उमप याने विठ्ठल उमप यांनी गायलेल्या गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम सादर केला. सिध्दार्थ आणि रवी जाधव यांनी यावेळी बोलताना विठ्ठल उमप यांच्या आठवणी जागवल्या. तसेच शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने पुरस्कार घेतांना सिध्दार्थचे डोळे ही पानावले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 04:02 PM IST

सिध्दार्थ आणि रवी जाधव यांना शाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार

18 जुलै

सध्याचा आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि नटरंग आणि बालगंधर्व असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक रवी जाधव यांना नुकतंच शाहीर विठ्ठल उमप स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आलं. ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे आणि निर्माता- दिग्दर्शक प्रकाश भेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गायक संगीतकार नंदेश उमप याने विठ्ठल उमप यांनी गायलेल्या गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम सादर केला. सिध्दार्थ आणि रवी जाधव यांनी यावेळी बोलताना विठ्ठल उमप यांच्या आठवणी जागवल्या. तसेच शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने पुरस्कार घेतांना सिध्दार्थचे डोळे ही पानावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close