S M L

शुभविवाह....पण बेडकांचा !

20 जुलैवाजंत्री, वर्‍हाडी, नटलेला वर आणि सजलेली वधू. बेडकांच्या आगळ्यावेगळ्या लग्नाचा सोहळा संपन्न झाला सटाणा तालुक्यातल्या विंचुरे गावात. पाऊस पडत नसल्याने बेडकांचे लग्न लावलं की पाऊस पडतो अशी या ग्रामस्थांची श्रद्धा. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बेडकांचे लग्न लावून कन्यादानापासून मंगलाष्टकांपर्यंत सर्व विधींनी हा लग्नसोहळा पार पडला. राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. या वर्षीतरी पावसाची माया बरसावी यासाठी बागलाण तालुक्यातील विचूरे येथे बेडकाचं लग्न लावण्यात आलं. बेडकाच्या शुभमंगलामुळे पाऊस पडतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. विचूरे ग्रामस्तांनी मांडव टाकला, आणि वधु-वराचा हळदीचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर आज सकाळी गावातून बेडूक वराची मिरवणूक काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2011 01:31 PM IST

शुभविवाह....पण बेडकांचा !

20 जुलै

वाजंत्री, वर्‍हाडी, नटलेला वर आणि सजलेली वधू. बेडकांच्या आगळ्यावेगळ्या लग्नाचा सोहळा संपन्न झाला सटाणा तालुक्यातल्या विंचुरे गावात. पाऊस पडत नसल्याने बेडकांचे लग्न लावलं की पाऊस पडतो अशी या ग्रामस्थांची श्रद्धा. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बेडकांचे लग्न लावून कन्यादानापासून मंगलाष्टकांपर्यंत सर्व विधींनी हा लग्नसोहळा पार पडला.

राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. या वर्षीतरी पावसाची माया बरसावी यासाठी बागलाण तालुक्यातील विचूरे येथे बेडकाचं लग्न लावण्यात आलं. बेडकाच्या शुभमंगलामुळे पाऊस पडतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. विचूरे ग्रामस्तांनी मांडव टाकला, आणि वधु-वराचा हळदीचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर आज सकाळी गावातून बेडूक वराची मिरवणूक काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close