S M L

अजितदादांच्या बर्थ डेला कार्यकर्त्यांची 'दबंग'गिरी

21 जुलै13 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे येत्या 22 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. पण राष्ट्रवादीच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही ते पचनी पडलेलं नाही आणि अखेर आज दादांच्या आवाहनाला हरताळ फासला. मोठा गाजावाजा करत रक्तदान शिबिर पार पाडले. यासाठी बॉलीवूडस्टार सलमान खान याने आज पुण्यात रक्तदान केलं. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात खुद्द सलमान खाननं रक्तदान केलं. आयोजकांनी सलमानला खास पुणेरी पगडी देऊन त्याच स्वागत केलं. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला 4 जीबीचा पेनड्राईव्हही देण्यात आला.पुण्यात अजितदादांचा 22 जुलै रोजी येणारा वाढदिवस म्हणजे काही कार्यकर्त्यांसाठी शहरभर फ्लेक्स, बॅनर्स लावून दादांच्या छबीसोबत आपली छबी झळकावून चमकण्याचा दिवस. मग भले अजितदादांनी शुभेच्छांचे बॅनर्स- फ्लेक्स लावून शहाराचे सौंदर्य बिघडवू नका असं सांगितले तरी ऐकतील ते कारयकर्ते कसले. पण यंदा मुंबईत बॉम्बस्फोट झाला आणि खुद्द दादांनीच वाढदिवसानिमित्त कसलेही कार्यक्रम साजरे करू नका असं फर्मान काढला. पण काही दिवसांआधीच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केलेल्या आमदार अनिल भोसले यांनी शक्कल लढवत मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना हे शिबिर समर्पित करत भावनिक झालर दिली. बॉम्बस्फोटाची दु:खद घटना आणि वाढदिवसाची आनंददायी घटना याचा मेळ त्यांनी घातला.शहरभर लावलेल्या हजारो बॅनर्सवर अजितदादांसोबत अनिल भोसलेंचीही छबी झळकतेय शिवाय रक्तदात्यांना 4 जीबीचा पेनड्राईव्ह देण्याचे आमिषही. आज 21 जुलैला सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संभाजी बागेत आयोजित केल्याल्या शिबिरात 10 हजार लोक रक्तदान करतील असा अंदाज आहे. दरम्यान अशा भंपकबाजीला आपला विरोध असल्याचा टोला खुद्द अजित पवार यांनीच अनिल भोसले यांना लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 09:27 AM IST

अजितदादांच्या बर्थ डेला कार्यकर्त्यांची 'दबंग'गिरी

21 जुलै

13 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे येत्या 22 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. पण राष्ट्रवादीच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही ते पचनी पडलेलं नाही आणि अखेर आज दादांच्या आवाहनाला हरताळ फासला. मोठा गाजावाजा करत रक्तदान शिबिर पार पाडले. यासाठी बॉलीवूडस्टार सलमान खान याने आज पुण्यात रक्तदान केलं.

राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात खुद्द सलमान खाननं रक्तदान केलं. आयोजकांनी सलमानला खास पुणेरी पगडी देऊन त्याच स्वागत केलं. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला 4 जीबीचा पेनड्राईव्हही देण्यात आला.

पुण्यात अजितदादांचा 22 जुलै रोजी येणारा वाढदिवस म्हणजे काही कार्यकर्त्यांसाठी शहरभर फ्लेक्स, बॅनर्स लावून दादांच्या छबीसोबत आपली छबी झळकावून चमकण्याचा दिवस. मग भले अजितदादांनी शुभेच्छांचे बॅनर्स- फ्लेक्स लावून शहाराचे सौंदर्य बिघडवू नका असं सांगितले तरी ऐकतील ते कारयकर्ते कसले.

पण यंदा मुंबईत बॉम्बस्फोट झाला आणि खुद्द दादांनीच वाढदिवसानिमित्त कसलेही कार्यक्रम साजरे करू नका असं फर्मान काढला. पण काही दिवसांआधीच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केलेल्या आमदार अनिल भोसले यांनी शक्कल लढवत मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना हे शिबिर समर्पित करत भावनिक झालर दिली. बॉम्बस्फोटाची दु:खद घटना आणि वाढदिवसाची आनंददायी घटना याचा मेळ त्यांनी घातला.

शहरभर लावलेल्या हजारो बॅनर्सवर अजितदादांसोबत अनिल भोसलेंचीही छबी झळकतेय शिवाय रक्तदात्यांना 4 जीबीचा पेनड्राईव्ह देण्याचे आमिषही. आज 21 जुलैला सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संभाजी बागेत आयोजित केल्याल्या शिबिरात 10 हजार लोक रक्तदान करतील असा अंदाज आहे. दरम्यान अशा भंपकबाजीला आपला विरोध असल्याचा टोला खुद्द अजित पवार यांनीच अनिल भोसले यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close