S M L

अंधत्वावर मात करून तो सी.ए. झाला !

गोविंद वाकडे,पुणे24 जुलैअथक मेहनत करुन अनेक जण चार्टड अकाउंटंट म्हणजे सी.ए होतात. त्यात नवीन असं काहीच नाही. पण पुस्तकं वाचण्यासाठी दृष्टी नाही, तरीही सीएच्या परिक्षेत पहिल्या क्रमांकाने पास होणे हे नक्कीच विशेष. ही कहाणी आहे भूषण तोष्णीवालची. "डोळे नसल्याचे मला दु:ख नाही" हे सांगणारा आहे भूषण तोष्णीवाल. जन्माच्या वीस दिवसातच त्याची दृष्टी गेली. पण अंधत्वाचे दु:ख तो कुरवाळत बसला नाही. मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा सकारात्म दृष्टीकोण, याच्या जोरावर भूषण चार्डट अकाउंटंटची परीक्षा पास झाला. ते ही पहिल्या क्रमांकाने.या यशाबद्दल भूषणला विचारले असता भूषण म्हणतो, ध्येय उच्च असेल तर मग त्यासाठी कठिण परिश्रम द्यावे लागतात. चार्टड अकाउंटंट होणं भूषणसाठी सोप नव्हतं. या अभ्यासक्रमाची पुस्तकं ब्रेल लीपीत उपलब्ध नाहीत. अशा वेळी आई पुस्तकं वाचून दाखवायची आणि भूषण अभ्यास करायचा. लॅपटॉपमध्ये असलेल्या स्क्रीन रिडर स्वॉफ्टवेअरचीही त्याला मदत झाली. शिवाय आई-वडिलांचा विश्वासही त्याच्या बरोबर होता.अभ्यासाशिवाय भूषणला संगीताचीही आवड आहे. भूषण लहानपणापासून गाणं शिकला. त्याच्या गाण्याचे अनेक कार्यक्रमही झाले. अभ्यास आणि गाण्यात त्याने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.भूषणची आई गायत्री तोष्णीवाल म्हणतात, मुल व्यंग घेऊन जन्माला आलं की फक्त घरी बसायचं. पण दु:ख करत बसण्यापेक्षा काहीतरी करण्याची जिद्द ठेवायची भूषणच्या आईनं दिलेला हा मोलाचा सल्ला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचवणे आणि खचलेल्या मनांना उभारी देण्याचा प्रयत्न करणे यासाठीच होती ही भूषणची कहाणी.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 04:02 PM IST

अंधत्वावर मात करून तो सी.ए. झाला !

गोविंद वाकडे,पुणे

24 जुलै

अथक मेहनत करुन अनेक जण चार्टड अकाउंटंट म्हणजे सी.ए होतात. त्यात नवीन असं काहीच नाही. पण पुस्तकं वाचण्यासाठी दृष्टी नाही, तरीही सीएच्या परिक्षेत पहिल्या क्रमांकाने पास होणे हे नक्कीच विशेष. ही कहाणी आहे भूषण तोष्णीवालची.

"डोळे नसल्याचे मला दु:ख नाही" हे सांगणारा आहे भूषण तोष्णीवाल. जन्माच्या वीस दिवसातच त्याची दृष्टी गेली. पण अंधत्वाचे दु:ख तो कुरवाळत बसला नाही. मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा सकारात्म दृष्टीकोण, याच्या जोरावर भूषण चार्डट अकाउंटंटची परीक्षा पास झाला. ते ही पहिल्या क्रमांकाने.

या यशाबद्दल भूषणला विचारले असता भूषण म्हणतो, ध्येय उच्च असेल तर मग त्यासाठी कठिण परिश्रम द्यावे लागतात. चार्टड अकाउंटंट होणं भूषणसाठी सोप नव्हतं. या अभ्यासक्रमाची पुस्तकं ब्रेल लीपीत उपलब्ध नाहीत. अशा वेळी आई पुस्तकं वाचून दाखवायची आणि भूषण अभ्यास करायचा. लॅपटॉपमध्ये असलेल्या स्क्रीन रिडर स्वॉफ्टवेअरचीही त्याला मदत झाली. शिवाय आई-वडिलांचा विश्वासही त्याच्या बरोबर होता.

अभ्यासाशिवाय भूषणला संगीताचीही आवड आहे. भूषण लहानपणापासून गाणं शिकला. त्याच्या गाण्याचे अनेक कार्यक्रमही झाले. अभ्यास आणि गाण्यात त्याने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

भूषणची आई गायत्री तोष्णीवाल म्हणतात, मुल व्यंग घेऊन जन्माला आलं की फक्त घरी बसायचं. पण दु:ख करत बसण्यापेक्षा काहीतरी करण्याची जिद्द ठेवायची भूषणच्या आईनं दिलेला हा मोलाचा सल्ला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचवणे आणि खचलेल्या मनांना उभारी देण्याचा प्रयत्न करणे यासाठीच होती ही भूषणची कहाणी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close