S M L

मराठी- तेलगू भाषेचं अतूट नातं

14 नोव्हेंबर, सोलापूर सिध्दार्थ गोदाम मराठीच्या मुद्यावर राजकारण तापलं आहे पण तरीही मराठी माणूस आणि उत्तर भारतीय यांनी त्यांच्यातलं आपलेपण जपलयं. मराठी - अमराठीतील दरी सांधण्याचे प्रयत्न प्रत्येकाकडून केले जात आहेत. महाराष्ट्रात चाललेला मराठी-अमराठी वाद उद्भवलाय तो राजकारणातून. परराज्यातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या सोलापूरच्या बोल्ली कुटुंबाला मात्र या वातावरणाची अजिबात भीती नाही. कारण त्यांनी मराठीलाच आपली आई मानलंय. त्यामुळे तेलगू-कन्नड-मराठी असा भाषेचा एक संदर पूल निर्माण झालाय. लक्ष्मीनारायण बोल्ली. तेलगू भाषिक अमराठी कवी. बालपण तेलंगणात गेलं. दहावीपर्यंत जेमतेम शिक्षण. आता सोलापुरात येऊन ते पूर्णपणे मराठीमय झालेत. त्यांच्या म्हणण्यानुसार तेलगू-मराठीचा संबध खूप जुना आहे. मराठीत भरपूर लिखाण करणार्‍या बोल्लींच्या अनेक पुस्तकांना बा.भ.बोरकर, पु.ल.देशपाडे यांनी प्रस्तावना लिहिल्यात. ' तुम्हाला बांधकाम करायचे आहे ना तर भिंती बांधू नका. पूल बांधा. भिंती बांधल्याने अडथळे येतात तर पूल बांधल्याने देवाण घेवाण होते' , असं लक्ष्मीनारायन बोल्ली सांगत होते. लक्ष्मीनारायण यांच्या पत्नी शोभा बोल्ली. मूळच्या कन्नड भाषिक. आता त्याही मराठीमय झाल्यात. मराठी नाट्यभूमीवरील अनेक पुरस्कार त्यांनी पटकावलेत. मराठीत निवेदन करणे त्यांचा छंदच. खुद्द पु.लं.ना ही हे ओळखता आलं नाही की शोभा या कन्नड भाषिक आहेत. एका कार्यक्रमात शोभा यांनी पु.लं.ना विचारलं, माझी मराठी कशी वाटते ? पु.ल.म्हणाले, तू कन्नड आहेस. मला तीन दिवसांत जाणवलंच नाही '. बोल्ली कुंटुंबासारखेच अनेक जण मराठीचे खंद्दे पुरस्कर्ते झाले. या मातीचं ऋण फेडण्यासाठी अशी अनेक अमराठी कुटुंबं माणूस सांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 02:34 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close