S M L

राळेगणसिध्दीत जल्लोष

19 ऑगस्टअण्णा हजारे आज तीन दिवसानंतर तिहारतुरूंगाबाहेर येताच राळेगणसिध्दीत एकच जल्लोष करण्यात आला. गावकरी रस्त्यावर उतरली. अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. ढोल ताशाच्या गजरात राळेगण दणाणून सोडला. अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत आजपर्यंत गावकर्‍यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली. राळेगणमध्ये आजही वारकर्‍यांनी दिंडी काढली. यावेळी शालेय विद्यार्थ्यासोबत अनेक गावकरीही वारकर्‍यांच्या वेशात दिंडीत सामील झाले. यादवबाबांच्या पालखीच्या दिंडीत यावेळी राळेगणच्या पंचक्रोशीतील गावकरी सामील झाले. लहान मुलं, तरुण, महिला, वृद्ध असे सगळे टाळ-मृदंगासह हरिनामाचा घोष करत, जनलोकपाल समर्थनाच्या टोप्या घालून दिंडीत आले होते. अगदी तुळशी - वृंदावनासह वारकरी महिला यादवबाबांच्या या पालखी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. दुपारी वारकरी कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. अण्णा बाहेर येताच एकच जल्लोष गावकर्‍यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 10:02 AM IST

राळेगणसिध्दीत जल्लोष

19 ऑगस्टअण्णा हजारे आज तीन दिवसानंतर तिहारतुरूंगाबाहेर येताच राळेगणसिध्दीत एकच जल्लोष करण्यात आला. गावकरी रस्त्यावर उतरली. अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. ढोल ताशाच्या गजरात राळेगण दणाणून सोडला. अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत आजपर्यंत गावकर्‍यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली.

राळेगणमध्ये आजही वारकर्‍यांनी दिंडी काढली. यावेळी शालेय विद्यार्थ्यासोबत अनेक गावकरीही वारकर्‍यांच्या वेशात दिंडीत सामील झाले. यादवबाबांच्या पालखीच्या दिंडीत यावेळी राळेगणच्या पंचक्रोशीतील गावकरी सामील झाले. लहान मुलं, तरुण, महिला, वृद्ध असे सगळे टाळ-मृदंगासह हरिनामाचा घोष करत, जनलोकपाल समर्थनाच्या टोप्या घालून दिंडीत आले होते. अगदी तुळशी - वृंदावनासह वारकरी महिला यादवबाबांच्या या पालखी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. दुपारी वारकरी कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. अण्णा बाहेर येताच एकच जल्लोष गावकर्‍यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close