S M L

भ्रष्टाचारावर लोकपाल विधेयक पुरेसं नाही- राहुल गांधी

26 ऑगस्टलोकपाल विधेयकाबाबत वादग्रस्त विधानं करत राहुल गांधी यांनी लोकसभेत आपलं मत व्यक्त केलं. सर्वांनाच भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे. मात्र याला सक्षम कार्यक्रमाची आवश्यकता आहे. बर्‍याच लोकांना असं वाटतं की एका विधेयकानं भ्रष्टाचार समाप्त होईल. पण मला शंका आहे. नव्या कायद्याची गरज आहे. पण केवळ लोकपाल विधेयकानं भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल असं वाटत नाही. हे विधेयक त्यावर पुरेसा उपाय नाही. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती करण्याचं मोठ काम केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. पण त्यापेक्षाही मोठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याकरता निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा हवी, असंही ते म्हणाले. अण्णांचं आंदोलन संसदेवर अधिकार गाजवल्याने लोकशाहीला घातक असंच आहे, असंही ते म्हणाले.टीम अण्णामधील सदस्य शांतीभूषण यांनी राहुल यांच्या स्वतंत्र संसदीय यंत्रणा असावी या सूचनेचं स्वागत केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2011 07:42 AM IST

भ्रष्टाचारावर लोकपाल विधेयक पुरेसं नाही- राहुल गांधी

26 ऑगस्ट

लोकपाल विधेयकाबाबत वादग्रस्त विधानं करत राहुल गांधी यांनी लोकसभेत आपलं मत व्यक्त केलं. सर्वांनाच भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे. मात्र याला सक्षम कार्यक्रमाची आवश्यकता आहे. बर्‍याच लोकांना असं वाटतं की एका विधेयकानं भ्रष्टाचार समाप्त होईल. पण मला शंका आहे. नव्या कायद्याची गरज आहे. पण केवळ लोकपाल विधेयकानं भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल असं वाटत नाही. हे विधेयक त्यावर पुरेसा उपाय नाही. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती करण्याचं मोठ काम केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. पण त्यापेक्षाही मोठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याकरता निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा हवी, असंही ते म्हणाले. अण्णांचं आंदोलन संसदेवर अधिकार गाजवल्याने लोकशाहीला घातक असंच आहे, असंही ते म्हणाले.

टीम अण्णामधील सदस्य शांतीभूषण यांनी राहुल यांच्या स्वतंत्र संसदीय यंत्रणा असावी या सूचनेचं स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 07:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close