S M L

वातावरणातलं ब्राउन क्लाउड चिंताजनक आणि धोकादायक

16 नोव्हेंबरजुही चौधरीसह दिव्या गोजरग्लोबल वॉर्मिंगचा धोका सा-या जगाला जाणवतोय. दुसरीकडं पर्यावरणविषयक आणखी एक समस्या नव्यानं निर्माण होतेय. त्याचं नाव आहे ब्राउन क्लाउड . संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमानुसार आशिया आणि आफ्रिका खंडात याचा धोका जाणवतोय. बीजिंग ते नवी दिल्लीपर्यंतची शहरं काळोखी होतं आहेत, हिमालयातलं बर्फ वितळतंय आणि हवामान दिवसेंदवस अधिक उष्ण होतंय. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमानुसार हा केवळ ग्रीन हाऊसचा परिणाम नाही. तर याला कारण आहे 2 मैल जाडीचं ब्राउन क्लाउड . अनेक आशियायी आणि आफ्रिकन देशांवर याचं सावट आहे. वाहनांचं वाढतं प्रमाण, अतोनात लाकूडतोड, बायोमास आणि खनिज इंधन जाळण्याच्या प्रमाणात वाढ यामुळे ब्राऊन क्लाऊड वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. वातावरणातलं ब्राउन क्लाउड खरंच चिंताजनक आणि धोकादायक आहे.असं यूएन पर्यावरण कार्यक्रमाचे सदस्य,अ‍ॅकिम स्टीनर यांचं म्हणणं आहे.ब्राउन क्लाउडमुळे नवी दिल्ली, कराची, शांघाय आणि बीजिंगपर्यंत पोचणारा सूर्यप्रकाश कमी होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 1950 पासून 25 टक्के प्रकाश कमी झाला आहे. यामुळे जमिनीचा पृष्ठभाग तर थंड होतोय. पण हिमालयाचं बर्फ मात्र झपाट्यानं वितळतंय. ब्राउन क्लाउडमुळे भारतात होत असलेल्या दुष्परिणामाचा अभ्यास अजून व्हायचा आहे. पण, हवेच्या प्रदूषणाची पातळी मात्र तात्काळ तपासण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 01:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close