S M L

केबीसीने घेतली विदर्भातल्या शेतकर्‍याची दखल

13 सप्टेंबरसोनीवरच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात चॅनलने विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबाची दखल घेण्याचं ठरवलं. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वारा येथील अपर्णा मालीकर यांची निवड करण्यात आली. 27 वर्षीय अपर्णा यांनी चक्क 6 लाख 40 हजार रूपये जिंकले. शिवाय अमिताभ बच्चन यांनीही त्यांना 50 हजारांची मदत जाहीर केली. अपर्णा यांच्या नव-यानं कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या केली होती. नव-याच्या मृत्यूनंतर अपर्णा यांच्यावर आभाळ कोसळलं. अशावेळी केबीसीच्या माध्यमातून त्यांना आशेचा किरण दिसला. जिंकलेल्या पैशातून त्यांना आधी त्यांच्यावर असलेले कर्ज फेडायचं आहे. आणि उरलेल्या पैशात घर बांधायचं आहे. मुलींच्या शिक्षणाचीही विशेष जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यासाठी त्या या उरलेल्या पैशाचा वापर करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 05:20 PM IST

केबीसीने घेतली विदर्भातल्या शेतकर्‍याची दखल

13 सप्टेंबर

सोनीवरच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात चॅनलने विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबाची दखल घेण्याचं ठरवलं. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वारा येथील अपर्णा मालीकर यांची निवड करण्यात आली. 27 वर्षीय अपर्णा यांनी चक्क 6 लाख 40 हजार रूपये जिंकले. शिवाय अमिताभ बच्चन यांनीही त्यांना 50 हजारांची मदत जाहीर केली. अपर्णा यांच्या नव-यानं कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या केली होती. नव-याच्या मृत्यूनंतर अपर्णा यांच्यावर आभाळ कोसळलं. अशावेळी केबीसीच्या माध्यमातून त्यांना आशेचा किरण दिसला. जिंकलेल्या पैशातून त्यांना आधी त्यांच्यावर असलेले कर्ज फेडायचं आहे. आणि उरलेल्या पैशात घर बांधायचं आहे. मुलींच्या शिक्षणाचीही विशेष जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यासाठी त्या या उरलेल्या पैशाचा वापर करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close