S M L

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

17 सप्टेंबरमराठवाडा मुक्तीसंग्रामाचा 63 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकासमोर ध्वजवंदन करण्यात आलं. मुख्यमंत्री चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आंदरांजली वाहिली. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्जा, खासदार चंद्रकांत खैरे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेली अनेक वर्षं राज्यातील पहिलं विधी विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे अशी मागणी होती. मात्र आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हे विद्यापीठ नागपूरला होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 10:57 AM IST

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

17 सप्टेंबर

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा 63 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकासमोर ध्वजवंदन करण्यात आलं. मुख्यमंत्री चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आंदरांजली वाहिली. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्जा, खासदार चंद्रकांत खैरे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेली अनेक वर्षं राज्यातील पहिलं विधी विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे अशी मागणी होती. मात्र आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हे विद्यापीठ नागपूरला होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close