S M L

माधुरी भारतात परतणार !

18 सप्टेंबरआपल्या अदाकारी, आणि आपल्या अभिनयाने कित्येक दशक सत्ता गाजवणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित-नेने आपल्या मायभूमीत परत येत आहे. 1999 ला डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह करून माधुरी कायमची अमेरिकेला स्थायी झाली. माधुरी आता भारतात कायमची परततेय. यासंदर्भात खुद्द माधुरीनंच ट्विट केलंय. येत्या ऑक्टोबरमध्ये माधुरी भारतात तिच्या कुटुंबाबरोबर परतत असल्याचं समजतं. टिवट्‌रवर माधुरी म्हणते, माझ्या सर्व चाहत्यांसाठी, आम्ही आता भारतात स्थायिक होतोय. आपल्या मायदेशात परतणं ही नेहमीच सुखद गोष्ट असते.'हम आपके हैं कौंन', 'खलनायक', 'बेटा' , 'दिल तो पागल है' या सिनेमांमुळे माधुरी कित्येक चाहत्यांच्या ह्रद्‌याची ती ' गजगामिनी' ठरली. या मराठी मुलीची एन्ट्री झाली ती 'अबोध' सिनेमातून. अमेरिकेत स्थायी झाल्यानंतर माधुरीला दोन मुलं झाली. घर संसाराचा गाडा ओढत असताना माधुरीने कॅमेरा समोर राह्याला आवडते असंही म्हटलं होतं. याचा प्रत्यय म्हणून माधुरीने 'आ जा नचले' हा सिनेमाही करून पाहिला मात्र फारस यश आलं नाही. तसेच छोट्या पडद्याच्या माध्यमातून 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातूनही ती प्रेक्षकांना भेट्याला आली. आता माधुरी खुद्द आपणं भारतात येणार असल्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का मिळाला असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 05:43 PM IST

माधुरी भारतात परतणार !

18 सप्टेंबर

आपल्या अदाकारी, आणि आपल्या अभिनयाने कित्येक दशक सत्ता गाजवणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित-नेने आपल्या मायभूमीत परत येत आहे. 1999 ला डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह करून माधुरी कायमची अमेरिकेला स्थायी झाली. माधुरी आता भारतात कायमची परततेय. यासंदर्भात खुद्द माधुरीनंच ट्विट केलंय. येत्या ऑक्टोबरमध्ये माधुरी भारतात तिच्या कुटुंबाबरोबर परतत असल्याचं समजतं. टिवट्‌रवर माधुरी म्हणते, माझ्या सर्व चाहत्यांसाठी, आम्ही आता भारतात स्थायिक होतोय. आपल्या मायदेशात परतणं ही नेहमीच सुखद गोष्ट असते.

'हम आपके हैं कौंन', 'खलनायक', 'बेटा' , 'दिल तो पागल है' या सिनेमांमुळे माधुरी कित्येक चाहत्यांच्या ह्रद्‌याची ती ' गजगामिनी' ठरली. या मराठी मुलीची एन्ट्री झाली ती 'अबोध' सिनेमातून. अमेरिकेत स्थायी झाल्यानंतर माधुरीला दोन मुलं झाली. घर संसाराचा गाडा ओढत असताना माधुरीने कॅमेरा समोर राह्याला आवडते असंही म्हटलं होतं. याचा प्रत्यय म्हणून माधुरीने 'आ जा नचले' हा सिनेमाही करून पाहिला मात्र फारस यश आलं नाही. तसेच छोट्या पडद्याच्या माध्यमातून 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातूनही ती प्रेक्षकांना भेट्याला आली. आता माधुरी खुद्द आपणं भारतात येणार असल्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का मिळाला असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close