S M L

लॉ कॉलेज होणार कोठे ?

प्रशांत कोरटकर, नागपूर 22 सप्टेंबरविदर्भातील प्रकल्प राज्यात इतरत्र पळवल्याच्या घटना तर नवीन नाही पण खुद्द राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नॅशनल लॉ कॉलेज नागपुरात होणार असं सांगण्यात आल्यानंतरही नॅशनल लॉ कॉलेज नागपूर नाहीत तर मुंबई जवळ वसईत होतं असल्याने काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार यांनी राज्यसरकार वर कडाडून टीका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सुवर्ण जंयती कार्यक्रमात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या भाषणात नागपूरमध्ये नॅशनल लॉ कॉलेज काढण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती व्ही एस शिरपूरपकर कार्यक्रमाला उपस्थित होते पण काही दिवसातच चक्र फिरली आणि राज्य सरकारने हे कॉलेज नागपूर ऐवजी वसईत काढण्याचं ठरवलं.नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरं मोठ ठिकाण आहे इथं 1932 पासून कायद्या संबधी च्या सर्व सोई उपलब्ध आहेत इतकच नाही तर नागपूरच्या लॉ कॉलेज मधून अनेक जेष्ठ वकील तयार झाले.विदर्भात मोठ्या प्रमाणात विज प्रकल्प दिल्या प्रकरणी काँग्रेस चे खासदार विलास मुत्तेमवार यांनी राज्य सरकारवर या आधीच टीका केली होती आता तर अजित पवार यांनी राज्यात अनेक लॉ स्कुल काढू या वक्तव्यावर मुत्तेमवार यांनी टीका केली. देशाच्या राष्ट्रपती विदर्भातल्या आहेत त्यामुळे नॅशनल लॉ स्कुल नागपुरातच होणार हा अनेकांचा समज खोटा ठरला. त्यामुळे विदर्भावर पुन्हा एकदा राज्य सरकारने सावत्रभाव केला असल्याची भावना विदर्भातील नागरिकांमध्ये आहे. त्याचबरोबर जर प्रत्येक राज्यात एकच लॉ स्कूल असेल तर मग महाराष्ट्राला दुसरा नियम कसा असा सवाल ही अनेकांनी अजित पवारांना केला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 02:04 PM IST

लॉ कॉलेज होणार कोठे ?

प्रशांत कोरटकर, नागपूर

22 सप्टेंबर

विदर्भातील प्रकल्प राज्यात इतरत्र पळवल्याच्या घटना तर नवीन नाही पण खुद्द राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नॅशनल लॉ कॉलेज नागपुरात होणार असं सांगण्यात आल्यानंतरही नॅशनल लॉ कॉलेज नागपूर नाहीत तर मुंबई जवळ वसईत होतं असल्याने काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार यांनी राज्यसरकार वर कडाडून टीका केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सुवर्ण जंयती कार्यक्रमात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या भाषणात नागपूरमध्ये नॅशनल लॉ कॉलेज काढण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती व्ही एस शिरपूरपकर कार्यक्रमाला उपस्थित होते पण काही दिवसातच चक्र फिरली आणि राज्य सरकारने हे कॉलेज नागपूर ऐवजी वसईत काढण्याचं ठरवलं.

नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरं मोठ ठिकाण आहे इथं 1932 पासून कायद्या संबधी च्या सर्व सोई उपलब्ध आहेत इतकच नाही तर नागपूरच्या लॉ कॉलेज मधून अनेक जेष्ठ वकील तयार झाले.

विदर्भात मोठ्या प्रमाणात विज प्रकल्प दिल्या प्रकरणी काँग्रेस चे खासदार विलास मुत्तेमवार यांनी राज्य सरकारवर या आधीच टीका केली होती आता तर अजित पवार यांनी राज्यात अनेक लॉ स्कुल काढू या वक्तव्यावर मुत्तेमवार यांनी टीका केली.

देशाच्या राष्ट्रपती विदर्भातल्या आहेत त्यामुळे नॅशनल लॉ स्कुल नागपुरातच होणार हा अनेकांचा समज खोटा ठरला. त्यामुळे विदर्भावर पुन्हा एकदा राज्य सरकारने सावत्रभाव केला असल्याची भावना विदर्भातील नागरिकांमध्ये आहे. त्याचबरोबर जर प्रत्येक राज्यात एकच लॉ स्कूल असेल तर मग महाराष्ट्राला दुसरा नियम कसा असा सवाल ही अनेकांनी अजित पवारांना केला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close