S M L

कोट्यावधी झाडं लावणार्‍या वांगारी मथाई यांचे निधन

26 सप्टेंबरकेनियाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या वांगारी मथाई यांचं कॅन्सरमुळे निधन झालंय. त्या 71 वर्षांच्या होत्या. नैरोबीच्या हॉस्पिटलमध्ये त्या अनेक वर्षं कॅन्सरशी झुंज देत होत्या. एक कोटींच्या वर झाडं लावणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. केनियाच्या वंगारी मथाईंचं नाव घेतलं की पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, स्वावलंबन या सगळ्या शब्दांचा खरा अर्थ कळतो. वंगारी मथाईंनी 1977 मध्ये केनियामध्ये ग्रीन बेल्ट मूव्हमेंट सुरू केली. या चळवळीमध्ये त्यांच्या प्रेरणेने आतापर्यंत एक कोटीच्या वर झाडं लावली गेली. जमिनीची धूप थांबवणं आणि जळणासाठी लाकूड मिळवून देणं हा त्यामागचा सुरुवातीचा उद्देश होता. वृक्षतोडीमुळे दुष्काळ, पाण्याचे प्रदूषण अशा समस्यांना तोडं द्यावं लागत होतं. वंगारी मथाईंना हे चित्रं पालटायचं होतं. त्यांनी आपल्या चऴवळीत महिलांना सोबत घेतलं. ज्या महिला वृक्षारोपणासमध्ये सहभागी झाल्या. त्यांना रोजगार ंमिळवून दिला. यामुळे या महिला स्वावलंबी झाल्या, त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण झालं. शिवाय केनियाचे पर्यावरण संवर्धनही झालं. ग्रीन बेल्ट चळवळीला यश आल्यानंतर वंगारी मथाईंनी मग केनियाच्या धोरणांवर लक्ष केंदि्रत केलं. रोजगारातून पर्यावरण संवर्धन हा त्यांचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. 2004 मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. वंगारी मथाईंच्या विस्तारलेल्या कामाला नवी ओळख मिळाली. 1998 मध्ये केनियामधल्या लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्टसाठी जी बेसुमार वृक्षतोड झाली. त्याविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष वंगारी मथाईंच्या कामाकडे गेलं. पण हे सगळं सुरू असताना मथाईंना टिंबर माफियांच्या लॉबीला सामोरं जावं लागलं. अटकसत्रं, तुरुंगवास हे सगळं सहन करताना राजकारण्यांपुढेही त्या दबल्या नाहीत. नैरोबीमधल्या करुआ पब्लिक फॉरेस्टमध्ये वृक्षारोपण करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला. पण मथाईंनी आपला लढा सुरूच ठेवला. कारण त्यांना माहीत होतं. त्यांनी पाहिलेलं झाडं लावण्याचं स्वप्न केवळ त्यांच्या केनियालाठी नाही, आफ्रिकेसाठी नाही तर अवघ्या जगासाठी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 05:33 PM IST

कोट्यावधी झाडं लावणार्‍या वांगारी मथाई यांचे निधन

26 सप्टेंबर

केनियाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या वांगारी मथाई यांचं कॅन्सरमुळे निधन झालंय. त्या 71 वर्षांच्या होत्या. नैरोबीच्या हॉस्पिटलमध्ये त्या अनेक वर्षं कॅन्सरशी झुंज देत होत्या. एक कोटींच्या वर झाडं लावणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. केनियाच्या वंगारी मथाईंचं नाव घेतलं की पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, स्वावलंबन या सगळ्या शब्दांचा खरा अर्थ कळतो. वंगारी मथाईंनी 1977 मध्ये केनियामध्ये ग्रीन बेल्ट मूव्हमेंट सुरू केली. या चळवळीमध्ये त्यांच्या प्रेरणेने आतापर्यंत एक कोटीच्या वर झाडं लावली गेली. जमिनीची धूप थांबवणं आणि जळणासाठी लाकूड मिळवून देणं हा त्यामागचा सुरुवातीचा उद्देश होता.

वृक्षतोडीमुळे दुष्काळ, पाण्याचे प्रदूषण अशा समस्यांना तोडं द्यावं लागत होतं. वंगारी मथाईंना हे चित्रं पालटायचं होतं. त्यांनी आपल्या चऴवळीत महिलांना सोबत घेतलं. ज्या महिला वृक्षारोपणासमध्ये सहभागी झाल्या. त्यांना रोजगार ंमिळवून दिला. यामुळे या महिला स्वावलंबी झाल्या, त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण झालं.

शिवाय केनियाचे पर्यावरण संवर्धनही झालं. ग्रीन बेल्ट चळवळीला यश आल्यानंतर वंगारी मथाईंनी मग केनियाच्या धोरणांवर लक्ष केंदि्रत केलं. रोजगारातून पर्यावरण संवर्धन हा त्यांचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. 2004 मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. वंगारी मथाईंच्या विस्तारलेल्या कामाला नवी ओळख मिळाली.

1998 मध्ये केनियामधल्या लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्टसाठी जी बेसुमार वृक्षतोड झाली. त्याविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष वंगारी मथाईंच्या कामाकडे गेलं. पण हे सगळं सुरू असताना मथाईंना टिंबर माफियांच्या लॉबीला सामोरं जावं लागलं. अटकसत्रं, तुरुंगवास हे सगळं सहन करताना राजकारण्यांपुढेही त्या दबल्या नाहीत. नैरोबीमधल्या करुआ पब्लिक फॉरेस्टमध्ये वृक्षारोपण करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला.

पण मथाईंनी आपला लढा सुरूच ठेवला. कारण त्यांना माहीत होतं. त्यांनी पाहिलेलं झाडं लावण्याचं स्वप्न केवळ त्यांच्या केनियालाठी नाही, आफ्रिकेसाठी नाही तर अवघ्या जगासाठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close