S M L

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न मिळावे - लता मंगेशकर

28 सप्टेंबरलता मंगेशकर यांचा आज 83 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिला हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार आज देण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी इच्छा दीदींनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. तर लतादीदी म्हणजे संगीताचा त्रिवेणी संगम आहे अशा शब्दात बिग बींनी लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंब उपस्थित होतं. यावेळी सुरेश वाडकर, सुनिधी चौहान, कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम यांचा खास सत्कार करण्यात आला. आंध्र प्रदेश सरकारकडून हृदयनाथ मंगेशकर यांचा आसाम संगीत विद्वान असा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यश चोप्रा, यश चोप्रा उपस्थित होते. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीजही यावेळी हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 06:18 PM IST

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न मिळावे - लता मंगेशकर

28 सप्टेंबर

लता मंगेशकर यांचा आज 83 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिला हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार आज देण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी इच्छा दीदींनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. तर लतादीदी म्हणजे संगीताचा त्रिवेणी संगम आहे अशा शब्दात बिग बींनी लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंब उपस्थित होतं. यावेळी सुरेश वाडकर, सुनिधी चौहान, कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम यांचा खास सत्कार करण्यात आला. आंध्र प्रदेश सरकारकडून हृदयनाथ मंगेशकर यांचा आसाम संगीत विद्वान असा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यश चोप्रा, यश चोप्रा उपस्थित होते. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीजही यावेळी हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close