S M L

गृहमंत्र्यांसोबत गावगुंड !

03 ऑक्टोबरराजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होते. तर दुसरीकडे पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे अनेकवेळा उघडही झाले आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या एका कार्यक्रमात तडीपार गुंड सुनील राऊत यांने हजेरी लावली. नागपूरमध्ये जंबू नगर इथल्या कार्यक्रमात गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सोबत तडीपार गुंड सुनील राऊत हा बिंदास्त वावरताना दिसला. सुनील राऊत याच्यावर खून, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे दाखल आहे. दरम्यान या अगोदर ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मागील वर्षी सप्टेंबर 10 मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे उघड झाले होते. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसिम सिद्दकी यांनी 11 सप्टेंबरला ईदच्या पार्टीचे आयोजन केले होते. सिद्दीकी यांनी भायखळ्याच्या इरफान पॅलेस या बिल्डिंगमध्ये 17 व्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही पार्टी दिली होती.यावेळी आर. आर. पाटील यांची ज्यांच्याशी भेट झाली, त्यात दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेला सलीम पटेल याचा समावेश होता. तर दुसरी व्यक्ती होती मोबीन कुरेशी. भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातील मोबीन हा एक आरोपी होता. तर एका हॉटेलवर दरोडा घातल्याचा गुन्हाही मोबीनवर दाखल आहे. तिसरी व्यक्ती होती इरफान कुरेशी. इरफान कुरेशी हा व्यवसायाने बिल्डर आहे. आणि बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी त्याला महापालिकेने नोटीशीही बजावल्या आहेत.एक नजर टाकूयात या गुन्हेगारांच्या कारकिर्दीवर -सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा -सलीम हा डॉन दाऊद इब्राहीम याची लहान बहिण हसिना पारकर हिचा ड्रायव्हर आहे. त्याचे डी कंपनीसोबतचे घनिष्ठ संबध सर्वश्रुत आहेत. हसिनाचा नवरा इब्राहीम पारकर याच्यावर 1992 मध्ये अरुण गवळीच्या गुंडानी हल्ला केला होता. यात इब्राहीमला वाचवताना सलिमला गोळी लागली होती.अवलानी बिल्डरने सलिम पटेल, हसिना पारकर आणि सलिम कुरेशी यांच्याविरोधात 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी 2006 मध्ये बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातून सलीम जामिनावर जेलबाहेर आहे. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी सलीमला मुंबई आणि हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. बोगस पासपोर्ट प्रकरणीही सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्याविरुध्द नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहेमोबीन कुरेशी -भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रेम कुमार शर्मा यांच्या खून प्रकरणात मोबीनचे नाव आले होते. मोबीनला पोलिसांनी अटक केली होती. सागर हॉटेलमध्ये दरोडा टाकल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी मोबीनविरुध्द गुन्हा दाखल आहे. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. याच कुरेशीला आबांनी अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नेमले आहे.इरफान कुरेशी -हा व्यवसायाने बिल्डर असून त्याच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अनेक नोटीसा बजावल्या आहेत. त्याचे नाव अनेकदा ब्लॅकलिस्टमध्ये अनेकदा आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2011 06:39 PM IST

गृहमंत्र्यांसोबत गावगुंड !

03 ऑक्टोबर

राजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होते. तर दुसरीकडे पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे अनेकवेळा उघडही झाले आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या एका कार्यक्रमात तडीपार गुंड सुनील राऊत यांने हजेरी लावली. नागपूरमध्ये जंबू नगर इथल्या कार्यक्रमात गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सोबत तडीपार गुंड सुनील राऊत हा बिंदास्त वावरताना दिसला. सुनील राऊत याच्यावर खून, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे दाखल आहे.

दरम्यान या अगोदर ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मागील वर्षी सप्टेंबर 10 मध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे उघड झाले होते. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसिम सिद्दकी यांनी 11 सप्टेंबरला ईदच्या पार्टीचे आयोजन केले होते. सिद्दीकी यांनी भायखळ्याच्या इरफान पॅलेस या बिल्डिंगमध्ये 17 व्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही पार्टी दिली होती.

यावेळी आर. आर. पाटील यांची ज्यांच्याशी भेट झाली, त्यात दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेला सलीम पटेल याचा समावेश होता. तर दुसरी व्यक्ती होती मोबीन कुरेशी. भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातील मोबीन हा एक आरोपी होता. तर एका हॉटेलवर दरोडा घातल्याचा गुन्हाही मोबीनवर दाखल आहे. तिसरी व्यक्ती होती इरफान कुरेशी. इरफान कुरेशी हा व्यवसायाने बिल्डर आहे. आणि बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी त्याला महापालिकेने नोटीशीही बजावल्या आहेत.एक नजर टाकूयात या गुन्हेगारांच्या कारकिर्दीवर -सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा -सलीम हा डॉन दाऊद इब्राहीम याची लहान बहिण हसिना पारकर हिचा ड्रायव्हर आहे. त्याचे डी कंपनीसोबतचे घनिष्ठ संबध सर्वश्रुत आहेत. हसिनाचा नवरा इब्राहीम पारकर याच्यावर 1992 मध्ये अरुण गवळीच्या गुंडानी हल्ला केला होता. यात इब्राहीमला वाचवताना सलिमला गोळी लागली होती.

अवलानी बिल्डरने सलिम पटेल, हसिना पारकर आणि सलिम कुरेशी यांच्याविरोधात 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी 2006 मध्ये बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातून सलीम जामिनावर जेलबाहेर आहे. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी सलीमला मुंबई आणि हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. बोगस पासपोर्ट प्रकरणीही सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्याविरुध्द नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे

मोबीन कुरेशी -भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रेम कुमार शर्मा यांच्या खून प्रकरणात मोबीनचे नाव आले होते. मोबीनला पोलिसांनी अटक केली होती. सागर हॉटेलमध्ये दरोडा टाकल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी मोबीनविरुध्द गुन्हा दाखल आहे. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. याच कुरेशीला आबांनी अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नेमले आहे.इरफान कुरेशी -

हा व्यवसायाने बिल्डर असून त्याच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अनेक नोटीसा बजावल्या आहेत. त्याचे नाव अनेकदा ब्लॅकलिस्टमध्ये अनेकदा आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2011 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close