S M L

झहीरने स्वीकारला अर्जुन पुरस्कार

04 ऑक्टोबरभारताचा फास्ट बॉलर झहीर खानसाठी काल सोमवारचा दिवस महत्वाचा ठरला. झहीरने काल अर्जुन पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात क्रीडामंत्री अजन माकन यांनी हा पुरस्कार देऊन झहीर खानचा गौरव केला. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता. पण झहीर खान इंग्लंड दौर्‍यावर असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नव्हता. झहीर सध्या बंगलोर इथल्या रिहॅब सेंटरमध्ये सराव करतोय. इंग्लंड दौर्‍यात त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती आणि या दुखापतीतून सावरत भारतीय क्रिकेट टीममध्ये लवकरच पुनरागमन करु असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 02:11 PM IST

झहीरने स्वीकारला अर्जुन पुरस्कार

04 ऑक्टोबर

भारताचा फास्ट बॉलर झहीर खानसाठी काल सोमवारचा दिवस महत्वाचा ठरला. झहीरने काल अर्जुन पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात क्रीडामंत्री अजन माकन यांनी हा पुरस्कार देऊन झहीर खानचा गौरव केला. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला होता. पण झहीर खान इंग्लंड दौर्‍यावर असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नव्हता. झहीर सध्या बंगलोर इथल्या रिहॅब सेंटरमध्ये सराव करतोय. इंग्लंड दौर्‍यात त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती आणि या दुखापतीतून सावरत भारतीय क्रिकेट टीममध्ये लवकरच पुनरागमन करु असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close