S M L

दीक्षाभूमीवर 55 वा धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा

06 ऑक्टोबरभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा केला जातो. या घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसर्‍याला दीक्षाभूमीवर येतात. 55 वा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आज संध्याकाळी 5.30 वाजता दीक्षाभूमीवर पार पडणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तर केरळचे राज्यपाल रा.सु.गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. गेल्या तीन दिवसापासून दिक्षाभूमीवर संबध देश आणि विदेशातून अंाबेडकरी अनूयायी येत आहेत. यावेळी जवळपास 5 लाख लोक येण्याची शक्यता आहे . जिल्हा प्रशासन, मनपातर्फे या अनुयांयाना सर्व सोयी पुरवण्यात येत आहे. बाहेरुन येणार्‍या गर्दीने शहरातील सर्व रस्ते गजबजून गेलेत. दिक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2011 11:43 AM IST

दीक्षाभूमीवर 55 वा धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा

06 ऑक्टोबर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा केला जातो. या घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसर्‍याला दीक्षाभूमीवर येतात.

55 वा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आज संध्याकाळी 5.30 वाजता दीक्षाभूमीवर पार पडणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तर केरळचे राज्यपाल रा.सु.गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. गेल्या तीन दिवसापासून दिक्षाभूमीवर संबध देश आणि विदेशातून अंाबेडकरी अनूयायी येत आहेत. यावेळी जवळपास 5 लाख लोक येण्याची शक्यता आहे . जिल्हा प्रशासन, मनपातर्फे या अनुयांयाना सर्व सोयी पुरवण्यात येत आहे. बाहेरुन येणार्‍या गर्दीने शहरातील सर्व रस्ते गजबजून गेलेत. दिक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close