S M L

केबीसीत सहभागी झालेल्या अर्पणाची सोनियांकडे तक्रार

09 ऑक्टोबरयवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नी अपर्णा मालीकर यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून आपला. मानसिक छळ होत असल्याची तक्रार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली. हा नेता आपला दीर असून हा छळ जर थांबला नाही तर आपण आत्महत्या करणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलंय. काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीच्या लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची दखल घेतलील. यासाठी अपर्णा मालीकर यांची निवड झाली होती. मालीकर यांनी 12 लाखाची रक्कमही जिंकली होती. आता त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलाय त्या माजी महापौर रघुनाथ मालीकर यांनी या आरोपाबाबत त्यांची भुमिका स्पष्ट केली. दरम्यान, रघुनाथ मालीकर यांनी अपर्णाचे सर्व आरोप फेटाळले असून याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 04:12 PM IST

केबीसीत सहभागी झालेल्या अर्पणाची सोनियांकडे तक्रार

09 ऑक्टोबर

यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नी अपर्णा मालीकर यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून आपला. मानसिक छळ होत असल्याची तक्रार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली. हा नेता आपला दीर असून हा छळ जर थांबला नाही तर आपण आत्महत्या करणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलंय. काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीच्या लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची दखल घेतलील. यासाठी अपर्णा मालीकर यांची निवड झाली होती. मालीकर यांनी 12 लाखाची रक्कमही जिंकली होती. आता त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलाय त्या माजी महापौर रघुनाथ मालीकर यांनी या आरोपाबाबत त्यांची भुमिका स्पष्ट केली. दरम्यान, रघुनाथ मालीकर यांनी अपर्णाचे सर्व आरोप फेटाळले असून याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close