S M L

कसाबच्या फाशीला तात्पुरती स्थगिती

10 ऑक्टोबरमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कसाबच्या फाशीवर 25 जानेवारीला आता सुनावणी होणार आहे. कसाबने फाशीच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र हि स्थगिती कोर्टाची एक प्रक्रिया आहे असं मत सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला पकडण्यात आलं होतं. कसाब हा एकमेव जिवंत दहशतवादी आहे जो भारताच्या ताब्यात आहे. कसाबला 21 फेब्रुवारीला उच्च न्यायलयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात कसाबने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती आफताब आलम आणि सी.के.प्रसाद यांनी कसाबच्या याचिकेवर बाजू ऐकल्यानंतर कसाबच्या फाशीवर स्थगिती दिली. न्यायमुर्ती आलम म्हणाले की, कसाबला आपला बचाव करण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेत असलेल्या बाजूंचा वापर करण्यासाठी संधी दिली पाहिजे. पण फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. सुरू राहण्यासाठी कोर्टानं ही स्थगिती दिलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 31 जानेवारी 2012 पासून सुरू होणार आहे. तेव्हापासून दररोज या केसची सुनावणी सुरू होईल. दरम्यान माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी फाशीच्या शिक्षेवर चर्चा करायची वेळ आली आहे असं मत व्यक्त केलंय. अनेक देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. भारतानंही त्यावर विचार करावा असं कलाम यांनी म्हंटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2011 09:46 AM IST

कसाबच्या फाशीला तात्पुरती स्थगिती

10 ऑक्टोबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कसाबच्या फाशीवर 25 जानेवारीला आता सुनावणी होणार आहे. कसाबने फाशीच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र हि स्थगिती कोर्टाची एक प्रक्रिया आहे असं मत सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला पकडण्यात आलं होतं. कसाब हा एकमेव जिवंत दहशतवादी आहे जो भारताच्या ताब्यात आहे. कसाबला 21 फेब्रुवारीला उच्च न्यायलयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात कसाबने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती आफताब आलम आणि सी.के.प्रसाद यांनी कसाबच्या याचिकेवर बाजू ऐकल्यानंतर कसाबच्या फाशीवर स्थगिती दिली. न्यायमुर्ती आलम म्हणाले की, कसाबला आपला बचाव करण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेत असलेल्या बाजूंचा वापर करण्यासाठी संधी दिली पाहिजे. पण फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. सुरू राहण्यासाठी कोर्टानं ही स्थगिती दिलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 31 जानेवारी 2012 पासून सुरू होणार आहे. तेव्हापासून दररोज या केसची सुनावणी सुरू होईल.

दरम्यान माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी फाशीच्या शिक्षेवर चर्चा करायची वेळ आली आहे असं मत व्यक्त केलंय. अनेक देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. भारतानंही त्यावर विचार करावा असं कलाम यांनी म्हंटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close