S M L

अण्णांची मागणी योग्य पण कायदे करून प्रश्न सुटणार नाही - मुख्यमंत्री

10 ऑक्टोबरराज्यात लोकायुक्तांना अधिकार मिळण्यासाठी सक्षम कायदा मंजूर करावा ही अण्णांची मागणी योग्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पण मात्र केवळ कायदे करुन प्रश्न सुटणार नाही तर जनतेची मानसिकताही बदलायला हवी असं मतंही त्यांनी व्यक्त केलं. संगमनेर इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त सक्षम कायदा मंजूर करावा अशी मागणी केली होती. जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करणात येईल असा इशारा दिला होता. दिल्ली झालेल्या जनलोकपाल विधेयकाची लढाई पाहता राज्यसरकारने तातडीने पाऊल उचलली आणि ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. तसेच अण्णांनी हिवाळी अधिवेशनापर्यंत थांबावे लगेच विरोध करणे चुकीची आहे असं मतही व्यक्त केलं होतं. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अण्णांच्या मागणीला होकार दर्शवला आहे. पण कायदे करून प्रश्न सुटणार नाही तर जनतेची मानसिकताही बदलायला हवी असं मतही व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2011 03:25 PM IST

अण्णांची मागणी योग्य पण कायदे करून प्रश्न सुटणार नाही - मुख्यमंत्री

10 ऑक्टोबर

राज्यात लोकायुक्तांना अधिकार मिळण्यासाठी सक्षम कायदा मंजूर करावा ही अण्णांची मागणी योग्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पण मात्र केवळ कायदे करुन प्रश्न सुटणार नाही तर जनतेची मानसिकताही बदलायला हवी असं मतंही त्यांनी व्यक्त केलं. संगमनेर इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त सक्षम कायदा मंजूर करावा अशी मागणी केली होती. जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करणात येईल असा इशारा दिला होता. दिल्ली झालेल्या जनलोकपाल विधेयकाची लढाई पाहता राज्यसरकारने तातडीने पाऊल उचलली आणि ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. तसेच अण्णांनी हिवाळी अधिवेशनापर्यंत थांबावे लगेच विरोध करणे चुकीची आहे असं मतही व्यक्त केलं होतं. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अण्णांच्या मागणीला होकार दर्शवला आहे. पण कायदे करून प्रश्न सुटणार नाही तर जनतेची मानसिकताही बदलायला हवी असं मतही व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2011 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close