S M L

नकोशी झाली हवीशी ; 58 नकुसा मुलींचे नामकरण

12 ऑक्टोबरमुलगा हवाच या हट्टापोटी जन्माला आलेली मुलगी नको असली की तिचं नाव नकुसा म्हणजेच नकोशी ठेवलं जातं. अशा नकोशी नावाच्या मुलींची संख्या सातारा जिल्ह्यात 200 च्यावर आहे. यातील 58 मुलींचे आज सातार्‍यात नामकरण करण्यात आलं. नकोशी नाव असलेल्या मुलींचा शोध गेल्या वर्षी सातारा आरोग्य विभागाने घेतला होता. त्यात 222 मुलींची नावं नकोशी असल्याचं आढळलं. आज आरोग्य विभागाने नामकरण सोहळ्यात 58 मुलींचे नाव बदलून त्यांना आवडणारे नाव दिलं. सात महिन्यांच्या मुलीपासून ते 18 वर्षांच्या वयापर्यंत नकोशींनी आपली नावे बदलून घेतली. या नकुसा नावाच्या मुलींचं जगणं आणि त्यांच्या नावामागची कहाणी आयबीएन-लोकमतने 'रिपोर्ताज' मध्ये दाखवली होती. नकुसा नावाच्या मुली घरात गरिबी असलेल्या कुटुंबातील आहेत. तसेच यातल्या अनेकींनी गरिबीमुळे शिक्षण सोडलं आहे. नकुसा बाजीराव गायकवाडनेही याच कारणामुळे बारावीनंतर कॉलेज सोडलं. आज तिचंही नामकरण झालं. आणि नकुशाची प्रीती झाली. आता लवकरच दिडशे मुलींच्या नामकरणाचा सोहळा सातारा प्रशासन आयोजित करणार आहे. पण नामकरण झाल्यानंतर या मुलींच्या जगण्यात फरक पडेल का असा सवाल विचारला जातोय. रिपोर्ताज : नकोशी

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:57 PM IST

नकोशी झाली हवीशी ; 58 नकुसा मुलींचे नामकरण

12 ऑक्टोबर

मुलगा हवाच या हट्टापोटी जन्माला आलेली मुलगी नको असली की तिचं नाव नकुसा म्हणजेच नकोशी ठेवलं जातं. अशा नकोशी नावाच्या मुलींची संख्या सातारा जिल्ह्यात 200 च्यावर आहे. यातील 58 मुलींचे आज सातार्‍यात नामकरण करण्यात आलं.

नकोशी नाव असलेल्या मुलींचा शोध गेल्या वर्षी सातारा आरोग्य विभागाने घेतला होता. त्यात 222 मुलींची नावं नकोशी असल्याचं आढळलं. आज आरोग्य विभागाने नामकरण सोहळ्यात 58 मुलींचे नाव बदलून त्यांना आवडणारे नाव दिलं. सात महिन्यांच्या मुलीपासून ते 18 वर्षांच्या वयापर्यंत नकोशींनी आपली नावे बदलून घेतली. या नकुसा नावाच्या मुलींचं जगणं आणि त्यांच्या नावामागची कहाणी आयबीएन-लोकमतने 'रिपोर्ताज' मध्ये दाखवली होती. नकुसा नावाच्या मुली घरात गरिबी असलेल्या कुटुंबातील आहेत. तसेच यातल्या अनेकींनी गरिबीमुळे शिक्षण सोडलं आहे.

नकुसा बाजीराव गायकवाडनेही याच कारणामुळे बारावीनंतर कॉलेज सोडलं. आज तिचंही नामकरण झालं. आणि नकुशाची प्रीती झाली. आता लवकरच दिडशे मुलींच्या नामकरणाचा सोहळा सातारा प्रशासन आयोजित करणार आहे. पण नामकरण झाल्यानंतर या मुलींच्या जगण्यात फरक पडेल का असा सवाल विचारला जातोय.

रिपोर्ताज : नकोशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2011 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close