S M L

विधानमंडळाचा अमृत महोत्सव 18 आणि 19 ऑक्टोबरला

16 ऑक्टोबरविधानमंडळाच्या अमृत महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपशीर करण्यात आला. राज्य अमृतमहोत्सवी सोहळा 18 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहे. राज्य सरकारच्या अमृतमहोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमासाठी पर्यावरण खात्यानं रात्री दहा नंतर लाऊड स्पीकरसाठी मनाई केली आहे. परवानगी नाकारल्याचं पत्र राज्य पर्यावरण खात्याने विधानमंडळ सचिवालयाला दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलींमुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याच पर्यावरण खात्याच्या सचिव वलसा नायर सिंग यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं. विधान मंडळ सचिवालयाने मुंबई जिल्हाधिकार्‍यांकडे 18 ऑक्टोबरला रात्री 10 नंतर लाऊड स्पिकरसाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. पण त्यावर विधान भवनाच्या खुल्या मंडपात रात्री दहानंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही असं विधानमंडळ सचिवालयाला सांगण्यात आल्याची माहिती वलसा नायर सिंग यानी दिली आहे. दरम्यान राज्य पर्यावरण खात्याच्या आक्षेपानंतर, विधीमंडळ सचिवालयाने सांस्कृतिक कार्यक्रम रात्री दहाच्या आत आटोपण्याचा निर्णय घेतला असं समजतंय. आधी 19 आणि 20 जुलैला होणारा हा अमृतमहोत्सवी सोहळा 13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटामुळे पुढे ढकलण्यात आला. तो आता 18 आणि 19 ऑक्टोबरला होतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 11:10 AM IST

विधानमंडळाचा अमृत महोत्सव 18 आणि 19 ऑक्टोबरला

16 ऑक्टोबर

विधानमंडळाच्या अमृत महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपशीर करण्यात आला. राज्य अमृतमहोत्सवी सोहळा 18 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहे. राज्य सरकारच्या अमृतमहोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमासाठी पर्यावरण खात्यानं रात्री दहा नंतर लाऊड स्पीकरसाठी मनाई केली आहे.

परवानगी नाकारल्याचं पत्र राज्य पर्यावरण खात्याने विधानमंडळ सचिवालयाला दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलींमुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याच पर्यावरण खात्याच्या सचिव वलसा नायर सिंग यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं. विधान मंडळ सचिवालयाने मुंबई जिल्हाधिकार्‍यांकडे 18 ऑक्टोबरला रात्री 10 नंतर लाऊड स्पिकरसाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती.

पण त्यावर विधान भवनाच्या खुल्या मंडपात रात्री दहानंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही असं विधानमंडळ सचिवालयाला सांगण्यात आल्याची माहिती वलसा नायर सिंग यानी दिली आहे. दरम्यान राज्य पर्यावरण खात्याच्या आक्षेपानंतर, विधीमंडळ सचिवालयाने सांस्कृतिक कार्यक्रम रात्री दहाच्या आत आटोपण्याचा निर्णय घेतला असं समजतंय. आधी 19 आणि 20 जुलैला होणारा हा अमृतमहोत्सवी सोहळा 13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटामुळे पुढे ढकलण्यात आला. तो आता 18 आणि 19 ऑक्टोबरला होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close