S M L

अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पलफेक

18 ऑक्टोबर_टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर लखनौ येथे एका कार्यक्रमात एका व्यक्तींने चप्पल फेकली आहे. जितेंद्र पाठक असं त्यांचं नाव आहे. टीम अण्णा देशाची दिशाभूल करत आहे मला याची चीड आली म्हणून मी चप्पल फेकली आहे अशी ग्वाही जितेंद्र पाठक यांनी दिली. जितेंद्र पाठक हा उत्तरप्रदेश येथील जालौन येथील रहिवासी आहे. टीम अण्णा आणि समर्थकांवर हा या महिन्यातला तिसरा हल्ला आहे. टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर काही दिवसांपूर्वी भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता आणि भूषण यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर दुसर्‍या दिवशी पतियाळा कोर्टाच्या परिसरात भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णांना समर्थकांना जबर मारहाण केली होती. आणि आज लखनौ येथे झूलेलाल पार्क येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी इंडिया अगेन्सट करप्शनच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सध्याकाळी सातच्या सुमारास केजरीवाल कार्यक्रमाला हजर झाले. गाडीतून उतरून स्टेजकडे जात असताना पत्रकारांमध्ये उपस्थित असलेल्या जितेंद्र पाठक या तरूणांने केजरीवाल यांच्यावर केजरीवाल यांच्यावर चप्पल भिरकावली. मात्रही चप्पल केजरीवाल यांना लागली नाही. यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. टीम अण्णा देशाची दिशाभूल करत आहे, केजरीवाल यांच्याशी मला कोणता राग नाही त्यांच्या विचारांचा आणि मतांचा मला चीड आली म्हणून मी त्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्यावर चप्पल भिरकावली अशी कबुली जितेंद्र पाठक यांने पोलिसांकडे दिली. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी चप्पलफेक करणार्‍या जितेंद्र पाठकला माफ केलं आहे. आपण त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही असं केजरीवाल यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2011 01:56 PM IST

अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पलफेक

18 ऑक्टोबर_

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर लखनौ येथे एका कार्यक्रमात एका व्यक्तींने चप्पल फेकली आहे. जितेंद्र पाठक असं त्यांचं नाव आहे. टीम अण्णा देशाची दिशाभूल करत आहे मला याची चीड आली म्हणून मी चप्पल फेकली आहे अशी ग्वाही जितेंद्र पाठक यांनी दिली. जितेंद्र पाठक हा उत्तरप्रदेश येथील जालौन येथील रहिवासी आहे. टीम अण्णा आणि समर्थकांवर हा या महिन्यातला तिसरा हल्ला आहे.

टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर काही दिवसांपूर्वी भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता आणि भूषण यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर दुसर्‍या दिवशी पतियाळा कोर्टाच्या परिसरात भगतसींग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णांना समर्थकांना जबर मारहाण केली होती. आणि आज लखनौ येथे झूलेलाल पार्क येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी इंडिया अगेन्सट करप्शनच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सध्याकाळी सातच्या सुमारास केजरीवाल कार्यक्रमाला हजर झाले. गाडीतून उतरून स्टेजकडे जात असताना पत्रकारांमध्ये उपस्थित असलेल्या जितेंद्र पाठक या तरूणांने केजरीवाल यांच्यावर केजरीवाल यांच्यावर चप्पल भिरकावली. मात्रही चप्पल केजरीवाल यांना लागली नाही. यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. टीम अण्णा देशाची दिशाभूल करत आहे, केजरीवाल यांच्याशी मला कोणता राग नाही त्यांच्या विचारांचा आणि मतांचा मला चीड आली म्हणून मी त्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्यावर चप्पल भिरकावली अशी कबुली जितेंद्र पाठक यांने पोलिसांकडे दिली. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी चप्पलफेक करणार्‍या जितेंद्र पाठकला माफ केलं आहे. आपण त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही असं केजरीवाल यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2011 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close