S M L

अमृतमहोत्सवी सोहळ्यात गांभीर्य नाही !

19 ऑक्टोबरविधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे काल उद्घाटन झालं. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा इतिहास बघायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ढिसाळ नियोजन आणि दर्जाहीन सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे वाद निर्माण झालेत. आजी माजी आमदारांनी या सोहळ्याच्या आयोजनावर टीका केली. ज्येष्ठ नेत्यांनीही सोहळ्याच्या दिखाऊपणावर नाराजी व्यक्त केली. तर राज्यातीला शेतकरी संकटात असताना भोजनावळी कसल्या घालता, असा सवाल ज्येष्ठ शेकाप नेते एन डी पाटील यांनी केला. विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात करण्यात आलेली रोषणाई आणि जल्लोष अनाठायी होता अशी टीका ज्येष्ठ शेकाप नेते एन डी पाटील यांनी पाटील यांनी केली. राज्य विधानमंडळाच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात सुरु झाला. आणि त्यासोबत वादही.कार्यक्रमाची सुरवात ज्या पद्धतीने झाली त्यावर अनेक आजी माजी खासदार नाराज झाले. शाहू-फुले आंबेडकराचा वारसा मिरवणार्‍या महाराष्ट्र सराकारला पुरोगामित्वाचा विसर पडलाय अशी टीका करण्यात येतेय.लटक्या झटक्यांनी कार्यक्रमात रंगत आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या स्वागतामध्ये शिष्टाचार पाळला गेला नाही. विलासरावांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांचं विलासरावांनंतर स्वागत करण्यात आलं, ही बाब अनेकांना खटकली. ज्या हुतात्मांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यांचाही विसर पडला.मान्यवरांच्या भाषणांमध्ये राष्ट्रपतींचं कौतुक जास्त आणि विधिमंडळाच्या कार्याचा गौरव कमी असं अनुभवायला मिळालं. विधिमंडळाच्या पंचाहत्तरीनिमित्त होणार्‍या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणं अपेक्षित होतं. पण, त्याऐवजी कार्यक्रम रंगारंग करणार्‍यावर भर दिला गेला, यावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दहा वाजण्यापूर्वी कार्यक्रम थांबवण्यात आला, त्यामुळे सभामंडप रिकामे झाल्यावर शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचा प्रसंग उरकून घेण्यात आला त्यामुळेही नव्या वादाला तोंड फुटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2011 04:43 PM IST

अमृतमहोत्सवी सोहळ्यात गांभीर्य नाही !

19 ऑक्टोबर

विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे काल उद्घाटन झालं. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा इतिहास बघायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ढिसाळ नियोजन आणि दर्जाहीन सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे वाद निर्माण झालेत. आजी माजी आमदारांनी या सोहळ्याच्या आयोजनावर टीका केली. ज्येष्ठ नेत्यांनीही सोहळ्याच्या दिखाऊपणावर नाराजी व्यक्त केली. तर राज्यातीला शेतकरी संकटात असताना भोजनावळी कसल्या घालता, असा सवाल ज्येष्ठ शेकाप नेते एन डी पाटील यांनी केला. विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात करण्यात आलेली रोषणाई आणि जल्लोष अनाठायी होता अशी टीका ज्येष्ठ शेकाप नेते एन डी पाटील यांनी पाटील यांनी केली.

राज्य विधानमंडळाच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात सुरु झाला. आणि त्यासोबत वादही.कार्यक्रमाची सुरवात ज्या पद्धतीने झाली त्यावर अनेक आजी माजी खासदार नाराज झाले. शाहू-फुले आंबेडकराचा वारसा मिरवणार्‍या महाराष्ट्र सराकारला पुरोगामित्वाचा विसर पडलाय अशी टीका करण्यात येतेय.

लटक्या झटक्यांनी कार्यक्रमात रंगत आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या स्वागतामध्ये शिष्टाचार पाळला गेला नाही. विलासरावांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांचं विलासरावांनंतर स्वागत करण्यात आलं, ही बाब अनेकांना खटकली. ज्या हुतात्मांमुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यांचाही विसर पडला.

मान्यवरांच्या भाषणांमध्ये राष्ट्रपतींचं कौतुक जास्त आणि विधिमंडळाच्या कार्याचा गौरव कमी असं अनुभवायला मिळालं. विधिमंडळाच्या पंचाहत्तरीनिमित्त होणार्‍या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणं अपेक्षित होतं. पण, त्याऐवजी कार्यक्रम रंगारंग करणार्‍यावर भर दिला गेला, यावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दहा वाजण्यापूर्वी कार्यक्रम थांबवण्यात आला, त्यामुळे सभामंडप रिकामे झाल्यावर शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचा प्रसंग उरकून घेण्यात आला त्यामुळेही नव्या वादाला तोंड फुटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close