S M L

अच्युत पालव यांचे सिल्व्हर कॅलिग्राफीचे प्रदर्शन

02 नोव्हेंबरमुंबईतल्या नेहरू आर्ट गॅलरीमध्ये सध्या सिल्व्हर कॅलिग्राफीचे प्रदर्शन भरलं आहे. शब्दांची कला देशभर प्रसिद्ध करणारे आणि वैविध्याने नटलेली भारतीय लिपी देशोविदेशी पोहचवणारे कॅलिग्राफर अच्युत पालव आणि जर्मनीच्या कॅथरीना पायपर यांचं हे प्रदर्शन आहे. कॅथरिना आणि अच्युत पालव यांनी केलेल्या कॅलिग्राफीच्या फ्युजनचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्तानंच या प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. हे प्रदर्शन सात नोव्हेंबरपर्यंत अकरा ते सात या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला खास पाहुणे होते जेष्ठ कवी गुलजार आणि अभिनेते नाना पाटेकरही कार्यक्रमाला उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2011 05:25 PM IST

अच्युत पालव यांचे सिल्व्हर कॅलिग्राफीचे प्रदर्शन

02 नोव्हेंबर

मुंबईतल्या नेहरू आर्ट गॅलरीमध्ये सध्या सिल्व्हर कॅलिग्राफीचे प्रदर्शन भरलं आहे. शब्दांची कला देशभर प्रसिद्ध करणारे आणि वैविध्याने नटलेली भारतीय लिपी देशोविदेशी पोहचवणारे कॅलिग्राफर अच्युत पालव आणि जर्मनीच्या कॅथरीना पायपर यांचं हे प्रदर्शन आहे. कॅथरिना आणि अच्युत पालव यांनी केलेल्या कॅलिग्राफीच्या फ्युजनचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्तानंच या प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. हे प्रदर्शन सात नोव्हेंबरपर्यंत अकरा ते सात या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला खास पाहुणे होते जेष्ठ कवी गुलजार आणि अभिनेते नाना पाटेकरही कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2011 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close