S M L

सरकार करतेय आमचे फोन टॅप - केजरीवाल

06 नोव्हेंबरब्लॉगच्या वादावरून काल अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगरला विश्वासघाती ठरवत सरकारवर कडाडून टीका केली. टीम अण्णांच्या सदस्यांची फोन टॅप होत असल्याच्या आरोपही अण्णांनी केला. आज टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सुध्दा अण्णांच्या आरोपाचा धागा पकडून सरकारकडून सदस्यांचे फोन टॅप होत असल्याच्या आरोप केला. यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे. अण्णांनी सदस्यांशी केलेलं संभाषण लगेचच पोलिसांना कसं कळतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर आमच्या सदस्यांचे फोन टॅप होत असतील तर 2 जी घोटाळ्यात आरोप झालेल्या चिदंबरम यांचे फोन टॅप करणार का असा सवालही केजरीवाल यांनी केला. तसेच उत्तराखंड सरकारने मंजूर केलेलं लोकायुक्त विधेयक आता केंद्राने तातडीने मंजूर करावे अशी मागणीही त्यांनी केली. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शकांना दिला चोपदरम्यान, आज नागपुरात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या शाखेच्या वतीनं वसंतराव देशपांडे सभागृहात अरविंद केजरीवाल यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच कार्यक्रमात केजरीवाल यांचं भाषण सुरू असताना सभागृहाबाहेर पन्नासच्यावर युवा घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून केजरीवाल यांचा निषेध केला. तसेच काळे झेंडे दाखवत केजरीवाल हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. त्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करणार्‍या कार्यकर्त्यांना झोडपलं. त्यानंतर युवा घंटानाद संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 09:28 AM IST

सरकार करतेय आमचे फोन टॅप - केजरीवाल

06 नोव्हेंबर

ब्लॉगच्या वादावरून काल अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगरला विश्वासघाती ठरवत सरकारवर कडाडून टीका केली. टीम अण्णांच्या सदस्यांची फोन टॅप होत असल्याच्या आरोपही अण्णांनी केला. आज टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सुध्दा अण्णांच्या आरोपाचा धागा पकडून सरकारकडून सदस्यांचे फोन टॅप होत असल्याच्या आरोप केला. यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे. अण्णांनी सदस्यांशी केलेलं संभाषण लगेचच पोलिसांना कसं कळतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर आमच्या सदस्यांचे फोन टॅप होत असतील तर 2 जी घोटाळ्यात आरोप झालेल्या चिदंबरम यांचे फोन टॅप करणार का असा सवालही केजरीवाल यांनी केला. तसेच उत्तराखंड सरकारने मंजूर केलेलं लोकायुक्त विधेयक आता केंद्राने तातडीने मंजूर करावे अशी मागणीही त्यांनी केली. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शकांना दिला चोपदरम्यान, आज नागपुरात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या शाखेच्या वतीनं वसंतराव देशपांडे सभागृहात अरविंद केजरीवाल यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच कार्यक्रमात केजरीवाल यांचं भाषण सुरू असताना सभागृहाबाहेर पन्नासच्यावर युवा घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून केजरीवाल यांचा निषेध केला. तसेच काळे झेंडे दाखवत केजरीवाल हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. त्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करणार्‍या कार्यकर्त्यांना झोडपलं. त्यानंतर युवा घंटानाद संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close