S M L

बेळगावच्या महापौरांचे पद रद्द करण्याचा कर्नाटकचा डाव

17 नोव्हेंबरकर्नाटक सरकारने पुन्हा एकदा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 1 नोव्हेंबरला बेळगावमध्ये काळा दिन पाळण्यात आला होता. त्यात भाग घेतल्यामुळे बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौंडा यांनी या संदर्भात सगळ्या कायदेशीर बाबींची माहिती घेऊन सध्याचे महापौर आणि उपमहापौरांचे पद कसं रद्द करता येईल, याबाबत योजना आखली आहे. याचाच एक भाग म्हणून बंगळुरूमध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर, उपमहापौर यांच्यासोबतच काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 28 मराठी भाषिक नगरसेवकांचे पद रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमावासीयांमध्ये संताप व्यक्त होतोय. जर असं झालं तर कर्नाटक सरकारला सळो की पळो करू, अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली.महापौर आणि उपमहापौराचे पद रद्द होतंय का याकडं सर्व मराठी भाषिकाचं लक्ष लागून आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 01:05 PM IST

बेळगावच्या महापौरांचे पद रद्द करण्याचा कर्नाटकचा डाव

17 नोव्हेंबर

कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 1 नोव्हेंबरला बेळगावमध्ये काळा दिन पाळण्यात आला होता. त्यात भाग घेतल्यामुळे बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौंडा यांनी या संदर्भात सगळ्या कायदेशीर बाबींची माहिती घेऊन सध्याचे महापौर आणि उपमहापौरांचे पद कसं रद्द करता येईल, याबाबत योजना आखली आहे. याचाच एक भाग म्हणून बंगळुरूमध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर, उपमहापौर यांच्यासोबतच काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 28 मराठी भाषिक नगरसेवकांचे पद रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमावासीयांमध्ये संताप व्यक्त होतोय. जर असं झालं तर कर्नाटक सरकारला सळो की पळो करू, अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली.महापौर आणि उपमहापौराचे पद रद्द होतंय का याकडं सर्व मराठी भाषिकाचं लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close