S M L

शरद पवारांवर माथेफिरुचा हल्ला

24 नोव्हेंबरकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आज नवी दिल्ली येथील दिल्ली येथील जंतरमंतर जवळील म.प.च्या कन्व्हेंशन सेंटरमधल्या कॉन्फरन्समध्ये हल्ला केला. हरविंदर सिंग असं या माथेफिरुचे नाव आहे. कॉन्फरन्समधून बाहेर येताना पवार यांच्यावर या तरुणांचे हल्ला चढवला आणि पवारांच्या श्रीमुखात भडकवली. पवारांच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच झडप घालून तरुणांला चोप दिली आणि त्या पोलिसांच्या हवाली केले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंद पुकारला आहे. मागील आठवड्या माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही याच माथेफिरू तरुणांने हल्ला केला होता. दिल्लीत एनडीएमसी सेंटरमध्ये इफकोच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शरद पवार यांना कापूस प्रश्नी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, यावेळी यावर उत्तर देणे योग्य नाही यासाठी टेक्सटाईल मंत्रालय आहे ते याबाबत बोलतील. पवारांच्या याच विधानाचा राग धरुन माथेफिरु तरुणांने हल्ला चढवला. यांच्याकडे घोटाळ्या शिवाय काही नाही हे सगळे चोर आहे असे जोर जोरात ओरडत होता. हरविंदर याने आपल्या खिश्यातून कृपाण काढून 'चीर दुंगा' असा दम भरत होता. मी चुकीचे काही केले नाही वाटलं तर मला मारा मी वेडा आहे. मी चूक केली नाही असं तो वारंवार सांगत होता. या अगोदर मीच सुखराम यांच्यावर हल्ला केला होता असंही माथेफिरु तरुण सांगत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 06:30 PM IST

शरद पवारांवर माथेफिरुचा हल्ला

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आज नवी दिल्ली येथील दिल्ली येथील जंतरमंतर जवळील म.प.च्या कन्व्हेंशन सेंटरमधल्या कॉन्फरन्समध्ये हल्ला केला. हरविंदर सिंग असं या माथेफिरुचे नाव आहे. कॉन्फरन्समधून बाहेर येताना पवार यांच्यावर या तरुणांचे हल्ला चढवला आणि पवारांच्या श्रीमुखात भडकवली. पवारांच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच झडप घालून तरुणांला चोप दिली आणि त्या पोलिसांच्या हवाली केले.

या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंद पुकारला आहे. मागील आठवड्या माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही याच माथेफिरू तरुणांने हल्ला केला होता. दिल्लीत एनडीएमसी सेंटरमध्ये इफकोच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शरद पवार यांना कापूस प्रश्नी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, यावेळी यावर उत्तर देणे योग्य नाही यासाठी टेक्सटाईल मंत्रालय आहे ते याबाबत बोलतील. पवारांच्या याच विधानाचा राग धरुन माथेफिरु तरुणांने हल्ला चढवला. यांच्याकडे घोटाळ्या शिवाय काही नाही हे सगळे चोर आहे असे जोर जोरात ओरडत होता. हरविंदर याने आपल्या खिश्यातून कृपाण काढून 'चीर दुंगा' असा दम भरत होता. मी चुकीचे काही केले नाही वाटलं तर मला मारा मी वेडा आहे. मी चूक केली नाही असं तो वारंवार सांगत होता. या अगोदर मीच सुखराम यांच्यावर हल्ला केला होता असंही माथेफिरु तरुण सांगत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close