S M L

शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पाविषयी खुल्या चर्चेत नारेबाजी

29 नोव्हेंबरजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध सुरूच आहे. शिवसेनेने आज या प्रकल्पाविषयी खुल्या चर्चेचं आयोजन केलं होतं. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणारे तज्ञ आणि एनपीसीआयएलचे शास्त्रज्ञ एकाच व्यासपीठावर आले होते. या शास्त्रज्ञांमध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शिवकुमार बॅनर्जी हे देखील सहभागी होते. जैतापूर, माडबन परिसरातील गावकरीही उपस्थित होते. यावेळी चर्चासत्रामध्ये भाषणं सुरू असताना प्रकल्प विरोधकांनी नारेबाजी केली. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना गोंधळ न घालण्याचे शांत राहण्याचं आवाहन केलं. या प्रकारमुळे काही काळ कार्यक्रम थांबवण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 05:24 PM IST

शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पाविषयी खुल्या चर्चेत नारेबाजी

29 नोव्हेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध सुरूच आहे. शिवसेनेने आज या प्रकल्पाविषयी खुल्या चर्चेचं आयोजन केलं होतं. मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणारे तज्ञ आणि एनपीसीआयएलचे शास्त्रज्ञ एकाच व्यासपीठावर आले होते. या शास्त्रज्ञांमध्ये जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शिवकुमार बॅनर्जी हे देखील सहभागी होते. जैतापूर, माडबन परिसरातील गावकरीही उपस्थित होते. यावेळी चर्चासत्रामध्ये भाषणं सुरू असताना प्रकल्प विरोधकांनी नारेबाजी केली. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना गोंधळ न घालण्याचे शांत राहण्याचं आवाहन केलं. या प्रकारमुळे काही काळ कार्यक्रम थांबवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close