S M L

भारताचं पारडं जड - गिलख्रिस्ट

07 डिसेंबरवेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन वन डे मॅच अजूनही बाकी आहेत. पण भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची चर्चा आतापासनूच सुरु झाली आहे. आणि यावेळी काही सीनिअर ऑसी खेळाडूंनाही वाटतंय की भारताचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर ऍडम गिलख्रिस्टने काल मुंबईत एका कार्यक्रमात तसं उघडपणे बोलूनही दाखवलं. गिलख्रिस्ट स्वत: क्रिकेट खेळत होता तेव्हा तो अजिबात असं म्हणाला नसता. कारण अर्थातच तेव्हाची ऑस्ट्रेलियन टीम...गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, पाँटिंग, सायमंड्स आणि मायकेल बेवन असे बॅट्समन तर मॅग्रा, गिलेस्पी आणि शेन वॉर्न सारखे बॉलर्स असलेली ऑसी टीम तेव्हा नंबर वन होती. मग टेस्ट असो की वन डे. पण सगळ्यांनाच आता माहीत आहे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियन टीमची कामगिरी घसरलीय. सलग दोनदा ऍशेस गमावल्यामुळे तर त्यांची प्रतिष्ठाही कमी झालीय. भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान मात्र मागच्या काही वर्षात एक वेगळी स्पर्धा निर्माण झाली. आगामी सीरिज रंगतदार होईल असं सगळ्यांना वाटतंय कारण दुसरीकडे भारतीय टीमची परदेशातली कामगिरी सुधारलीय. इंग्लंड दौर्‍यातील अपयश सोडलं तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेत टीमची कामगिरी नक्कीच चांगली होती. शिवाय गेल्या तीन ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही टीमचा आलेख चढता आहे. सेहवाग, द्रविड आणि गंभीर परदेशातही हुकमी रन करतायत. सचिनची शंभरावी सेंच्युरीही ऑस्ट्रेलियात पहायला मिळेल असं गिलख्रिस्टला वाटतंय. बॉक्सिंग डे टेस्टने येत्या 26 डिसेंबरला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. आणि यावेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याची कामगिरी भारतीय टीम करते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 01:43 PM IST

भारताचं पारडं जड - गिलख्रिस्ट

07 डिसेंबर

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन वन डे मॅच अजूनही बाकी आहेत. पण भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची चर्चा आतापासनूच सुरु झाली आहे. आणि यावेळी काही सीनिअर ऑसी खेळाडूंनाही वाटतंय की भारताचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर ऍडम गिलख्रिस्टने काल मुंबईत एका कार्यक्रमात तसं उघडपणे बोलूनही दाखवलं.

गिलख्रिस्ट स्वत: क्रिकेट खेळत होता तेव्हा तो अजिबात असं म्हणाला नसता. कारण अर्थातच तेव्हाची ऑस्ट्रेलियन टीम...गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, पाँटिंग, सायमंड्स आणि मायकेल बेवन असे बॅट्समन तर मॅग्रा, गिलेस्पी आणि शेन वॉर्न सारखे बॉलर्स असलेली ऑसी टीम तेव्हा नंबर वन होती. मग टेस्ट असो की वन डे. पण सगळ्यांनाच आता माहीत आहे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियन टीमची कामगिरी घसरलीय. सलग दोनदा ऍशेस गमावल्यामुळे तर त्यांची प्रतिष्ठाही कमी झालीय. भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान मात्र मागच्या काही वर्षात एक वेगळी स्पर्धा निर्माण झाली.

आगामी सीरिज रंगतदार होईल असं सगळ्यांना वाटतंय कारण दुसरीकडे भारतीय टीमची परदेशातली कामगिरी सुधारलीय. इंग्लंड दौर्‍यातील अपयश सोडलं तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेत टीमची कामगिरी नक्कीच चांगली होती. शिवाय गेल्या तीन ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही टीमचा आलेख चढता आहे. सेहवाग, द्रविड आणि गंभीर परदेशातही हुकमी रन करतायत. सचिनची शंभरावी सेंच्युरीही ऑस्ट्रेलियात पहायला मिळेल असं गिलख्रिस्टला वाटतंय.

बॉक्सिंग डे टेस्टने येत्या 26 डिसेंबरला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. आणि यावेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याची कामगिरी भारतीय टीम करते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close