S M L

श्रद्धांजलीच्या कार्यक्रमावर शहिदांच्या कुटुंबीयांचा बहिष्कार

13 डिसेंबरसंसदेवरच्या अतिरेकी हल्ल्याला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज सर्वपक्षीय खासदार आणि सुरक्षा रक्षकांनी हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या आवारात त्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार, अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. पण हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबीयांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हल्ल्यातला दोषी अफजल गुरुला फाशी दिली जात नाही, तोपर्यंत अशा कार्यक्रमात भाग घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे एक निवेदन सादर केलं. अफजल गुरुच्या फाशीची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली. याच मागणीसाठी 5 वर्षांपूर्वी शहिदांच्या कुटुंबीयांनी शौर्य पदकं परत केली होती. इंडिया गेटवरच्या अमर ज्योती जवानवर जाऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. 13 डिसेंबर 2001 रोजी जैश ए मोहम्मदच्या पाच अतिरेक्यांनी संसदेच्या आवारात घुसून अचानक गोळीबार सुरू केला. यावेळी बहुतांशी खासदार संसदेत होते. अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संसदेतल्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिकार केला. त्यात पाचही अतिरेकी ठार झाले. तर दिल्ली पोलिसांचे पाच अधिकारी, 2 राज्यसभा असिस्टंट, माळी आणि एका कॅमेरामनने या हल्ल्यात जीव गमावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 05:35 PM IST

श्रद्धांजलीच्या कार्यक्रमावर शहिदांच्या कुटुंबीयांचा बहिष्कार

13 डिसेंबर

संसदेवरच्या अतिरेकी हल्ल्याला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज सर्वपक्षीय खासदार आणि सुरक्षा रक्षकांनी हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या आवारात त्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार, अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. पण हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबीयांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हल्ल्यातला दोषी अफजल गुरुला फाशी दिली जात नाही, तोपर्यंत अशा कार्यक्रमात भाग घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे एक निवेदन सादर केलं. अफजल गुरुच्या फाशीची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली. याच मागणीसाठी 5 वर्षांपूर्वी शहिदांच्या कुटुंबीयांनी शौर्य पदकं परत केली होती. इंडिया गेटवरच्या अमर ज्योती जवानवर जाऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. 13 डिसेंबर 2001 रोजी जैश ए मोहम्मदच्या पाच अतिरेक्यांनी संसदेच्या आवारात घुसून अचानक गोळीबार सुरू केला. यावेळी बहुतांशी खासदार संसदेत होते. अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संसदेतल्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिकार केला. त्यात पाचही अतिरेकी ठार झाले. तर दिल्ली पोलिसांचे पाच अधिकारी, 2 राज्यसभा असिस्टंट, माळी आणि एका कॅमेरामनने या हल्ल्यात जीव गमावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close