S M L

आंदोलन मागे घेण्यासाठी मंत्र्याने दिली होती लाच - बाबा रामदेव

14 डिसेंबरकाळापैश्याच्या मुद्द्यावर रामलीला मैदानावरचे आंदोलन मागे घेण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्याने ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट योगगुरू बाबा रामदेव यांनी केला. तसेच त्यावेळी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मारण्याचा कट होता असा आरोप बाबा रामदेव यांनी केला.आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी खासबातचीत करतांना बाबा रामदेव यांनी हा आरोप केला.येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यामंत्र्याचे नाव जाहीर करणार असल्याचंही बाबा रामदेव यांनी सांगितलं. बाबा रामदेव यांची सविस्तर मुलाखत आपण पाहु शकतात आमच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात. काळापैश्याच्या मुद्द्यावर बाबा रामदेव यांनी 4 जूनला रामलीला मैदानावर उपोषण केले होते. बाबांच्या उपोषणाला 24 तास उलटत नाही तोच दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री कारवाई केली आणि आंदोलन उधळून लावले. पोलिसांनी बाबा रामदेव यांना ताब्यात घेऊन त्याच रात्री डेहराडूनला आणि नंतर हरिव्दारला नेले होते. यानंतर बाबा रामदेव आणि सरकारमध्ये आंदोलन फिक्स होते असे आरोप-प्रत्यारोप झाले. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा समाजतून तीव्र निषेध झाला. आज पुण्यात बाबा रामदेव यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत बाबांनी आंदोलनाबाबत गौप्यस्फोट केला. बाबा म्हणतात, 4 जूनला जेव्हा आम्ही आंदोलन केले होते आणि त्याच रात्री पोलिसांनी आंदोलन उधळून लावले होते. यावेळी माझी हत्याकरण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली होती. माझ्या सोबत असलेल्या 1 हजार आंदोलकांनाही मारण्याच कट रचला गेला होता. यावेळी 100 लोक जरी मारले गेले असते तर आंदोलन उभे राहु शकले नसते असा गौप्यस्फोट बाबांनी केला. आणि त्यावेळी पोलीस दलातील काही जवानांनी बाबांसोबत असं कृत्य आम्हाला करायचे नाही असं सांगत माघार घेतली होती. अनेक महापुरुषांनी अशा वेळी शिकवण दिली आहे की, 'अशा वेळी दोन पावलं मागे घ्यावीत' तेच मी केलं. पण मला पळकुटा आहे असं म्हटलं गेलं. पण आजही या मुद्द्यावर बलिदानाची तयार आहे असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांनी ऑफर दिली होती. आंदोलन मागे घ्या वाटेल तितका पैसा आपल्याला दिला जाईल असा गौप्यस्फोट बाबांनी केला. तसेच या नेत्यांची नाव मी येत्या निवडणुकीत जाहीर करणार असंही बाबांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 05:35 PM IST

आंदोलन मागे घेण्यासाठी मंत्र्याने दिली होती लाच - बाबा रामदेव

14 डिसेंबर

काळापैश्याच्या मुद्द्यावर रामलीला मैदानावरचे आंदोलन मागे घेण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्याने ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट योगगुरू बाबा रामदेव यांनी केला. तसेच त्यावेळी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मारण्याचा कट होता असा आरोप बाबा रामदेव यांनी केला.आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी खासबातचीत करतांना बाबा रामदेव यांनी हा आरोप केला.येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यामंत्र्याचे नाव जाहीर करणार असल्याचंही बाबा रामदेव यांनी सांगितलं. बाबा रामदेव यांची सविस्तर मुलाखत आपण पाहु शकतात आमच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात.

काळापैश्याच्या मुद्द्यावर बाबा रामदेव यांनी 4 जूनला रामलीला मैदानावर उपोषण केले होते. बाबांच्या उपोषणाला 24 तास उलटत नाही तोच दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री कारवाई केली आणि आंदोलन उधळून लावले. पोलिसांनी बाबा रामदेव यांना ताब्यात घेऊन त्याच रात्री डेहराडूनला आणि नंतर हरिव्दारला नेले होते. यानंतर बाबा रामदेव आणि सरकारमध्ये आंदोलन फिक्स होते असे आरोप-प्रत्यारोप झाले. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा समाजतून तीव्र निषेध झाला.

आज पुण्यात बाबा रामदेव यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत बाबांनी आंदोलनाबाबत गौप्यस्फोट केला. बाबा म्हणतात, 4 जूनला जेव्हा आम्ही आंदोलन केले होते आणि त्याच रात्री पोलिसांनी आंदोलन उधळून लावले होते. यावेळी माझी हत्याकरण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली होती. माझ्या सोबत असलेल्या 1 हजार आंदोलकांनाही मारण्याच कट रचला गेला होता. यावेळी 100 लोक जरी मारले गेले असते तर आंदोलन उभे राहु शकले नसते असा गौप्यस्फोट बाबांनी केला.

आणि त्यावेळी पोलीस दलातील काही जवानांनी बाबांसोबत असं कृत्य आम्हाला करायचे नाही असं सांगत माघार घेतली होती. अनेक महापुरुषांनी अशा वेळी शिकवण दिली आहे की, 'अशा वेळी दोन पावलं मागे घ्यावीत' तेच मी केलं. पण मला पळकुटा आहे असं म्हटलं गेलं. पण आजही या मुद्द्यावर बलिदानाची तयार आहे असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसेच आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांनी ऑफर दिली होती. आंदोलन मागे घ्या वाटेल तितका पैसा आपल्याला दिला जाईल असा गौप्यस्फोट बाबांनी केला. तसेच या नेत्यांची नाव मी येत्या निवडणुकीत जाहीर करणार असंही बाबांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close