S M L

महिलाप्रमाणे कल्याण खातं काढा -पुरुषांच्या संघटनेची मागणी

19 नोव्हेंबर, दिल्ली आशिष दीक्षित पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात दरवर्षी 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून पाळला जातो. ' सेव्ह फॅमिली फाऊंडेशन ' नावाच्या पुरुष हक्क संस्थेनं बंगळुरू आणि दिल्लीत निदर्शनं केली आणि पुरुषावर होणार्‍या अत्याचारांवर प्रकाश टाकला. मंत्रिमंडळात महिला कल्याण विभागाप्रमाणे पुरुष कल्याण मंत्रालयही असावं, अशी मागणी या पुरुषांनी केली आहे. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेला प्रत्येक पुरुष बायकोच्या जाचामुळे किंवा हटवादी कायद्यामुळे गांजून गेलाय. भारतातले कायदे हे स्त्रियांना झुकतं माप देतात आणि त्याचा त्रास पुरुषांना होतो, असं यांचं म्हणणं आहे. म्हणून विवाहविषयक कायद्यात बदल करावा आणि महिलांप्रमाणे पुरुष कल्याण खातं काढावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. ' पुरुषांना एटीएम सारखं वापरलं जातं. खोटे पोलीस प्रकरणं दाखल करून आमच्याकडून पैसे वसूल केले जातात ' , असं संघटनेचे संयोजक स्वरुप सरकार यांनी सांगितलं.या संघटनेतील प्रत्येक माणसाची कहाणी दु:खानं भरलेली आहे. त्यातीलच एक कपिल रस्तोगी. कपिल हा एक विमा एजंट. प्रेमविवाह झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नीनं त्याला धर्मसंकटात टाक लं. तुझ्या आई आणि आजीला वृद्धाश्रमात पाठवं, असा आग्रह कपिलकडे धरला. त्यांनी ऐकलं नाही म्हणून ती माहेरी निघून गेली. पुढे कपिलच्या बायकोनं त्याच्यावर सरळ हुंडा मागितल्याचा आरोप ठेवला आणि पोलिसांत तक्रार नोंदवली. बायकोला आणि पोलिसांच्या छळाला कंटाळलेला कपिल पुढे या संघटनेमध्ये आला. फाऊंडेशनच्या मदतीनं त्याची या कचाट्यातनं सुटका झाली. पण त्याच्यासारखेच कित्येक पुरुष आजही अन्यायाला बळी जात आहेत. फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला मिळणार्‍या प्रतिसादावरुन तरी असंच म्हणावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 05:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close