S M L

शिवसेनेचा सपाटा ; संध्याकाळ ऐवजी सकाळीच उद्घाटन

03 जानेवारीमुंबईत अंधेरीमध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वर्ल्डकप गॅलरीचं उद्घाटन केलं. उद्घाटनाचा हा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार होता. पण आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापूर्वीच तो कार्यक्रम उरकण्यात आला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 ला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि यानंतर तब्बल 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय टीमनं वर्ल्ड कपवर दुसर्‍यांदा नाव कोरलं. भारतीय क्रिकेट इतिहासातला हा सर्वोच्च क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता यावा यासाठी मुंबईमध्ये ही सहारा वर्ल्ड कप गॅलरी उभारण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी आज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केलं. इतकंच काय गेल्या पाच वर्षांत शिवसेनेनं मुंबई महापालिकेत केलेल्या कामांच्या जाहिरातींचे पोस्टर्सही शिवसेनेनं मुंबईभर लावले आहेत. पण, उद्धव ठाकरे यांनी मात्र आघाडी सरकारवरच टीका करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 11:57 AM IST

शिवसेनेचा  सपाटा ; संध्याकाळ ऐवजी सकाळीच उद्घाटन

03 जानेवारी

मुंबईत अंधेरीमध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वर्ल्डकप गॅलरीचं उद्घाटन केलं. उद्घाटनाचा हा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार होता. पण आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापूर्वीच तो कार्यक्रम उरकण्यात आला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 ला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि यानंतर तब्बल 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय टीमनं वर्ल्ड कपवर दुसर्‍यांदा नाव कोरलं. भारतीय क्रिकेट इतिहासातला हा सर्वोच्च क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता यावा यासाठी मुंबईमध्ये ही सहारा वर्ल्ड कप गॅलरी उभारण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी आज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केलं. इतकंच काय गेल्या पाच वर्षांत शिवसेनेनं मुंबई महापालिकेत केलेल्या कामांच्या जाहिरातींचे पोस्टर्सही शिवसेनेनं मुंबईभर लावले आहेत. पण, उद्धव ठाकरे यांनी मात्र आघाडी सरकारवरच टीका करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close