S M L

अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

04 जानेवारीनिवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा 3 जानेवारीला दुपारी 3.30 वाजता केल्यानंतर आणि त्याचवेळी आचारसंहिता लागू झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्डाणपुलाचे भूमीपूजन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. अजित पावारांविरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार पुण्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे शिवसेनेचे पालिकेतील गटनेते शाम देशपांडे यांनी नोंदवली आहे. काल संध्याकाळी राषट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित उड्डाणपुलाचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं.अजितदादांनी कार्यक्रमानंतर सभेत बोलताना काँग्रेसचे खासदार जेलमध्ये आहेत अशी टीकाही केली होती. पण या प्रकारानंतरही अनिल भोसले यांनी मात्र आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 02:47 PM IST

अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

04 जानेवारी

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा 3 जानेवारीला दुपारी 3.30 वाजता केल्यानंतर आणि त्याचवेळी आचारसंहिता लागू झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्डाणपुलाचे भूमीपूजन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

अजित पावारांविरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार पुण्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे शिवसेनेचे पालिकेतील गटनेते शाम देशपांडे यांनी नोंदवली आहे. काल संध्याकाळी राषट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित उड्डाणपुलाचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं.अजितदादांनी कार्यक्रमानंतर सभेत बोलताना काँग्रेसचे खासदार जेलमध्ये आहेत अशी टीकाही केली होती. पण या प्रकारानंतरही अनिल भोसले यांनी मात्र आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close