S M L

पानीपतच्या युद्धभूमीवर वीरांना सलाम

7 जानेवारी, पानीपतपानीपत फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पानीपत महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. पानीपतच्या दुस•या लढाईला येत्या 14 जानेवारीला 251 वर्ष पुर्ण होत आहेत. 1761 मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामधली ही लढाई हरयाणा राज्यातल्या पानीपत या गावात झाली होती. या लढाईत मराठ्यांचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची दखल इतिहासाला घ्यावीच लागलीय. याच पानीपतच्या युद्धभुमीवरुन शनिवारी शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला.शनिवारी पानिपतच्या युध्दभुमीवर शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंघ हुड्डा हे हजर होते. ज्या गावात पानिपतची लढाई झाली त्या उग्राखेडी या गावामध्ये महाराष्ट्र हरयाणाया मैत्री द्वार कमान उभारण्यात येणार आहे, त्याचं भुमीपुजन भुपिंदरसिंघ हुड्डा यांनी केलं. तसेच पानीपतच्या रणांगण भुमीवर उभारण्यात आलेल्या स्मारकावरही त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या सोबत हरयाणाचे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर हरयानवी भाषेत वीरगितांचा कार्यक्रम सादर झाला. पानिपतच्या युद्धभूमीवर जाणं हा एक रोमांचकारी अनुभव होता, असं गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सांगितलं. पानिपत महोत्सवाची सुरुवात गेल्या पाच वर्षांपूर्वी अजित जोशी या आयएएस अधिका-याने केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 02:50 PM IST

पानीपतच्या युद्धभूमीवर वीरांना सलाम

7 जानेवारी, पानीपत

पानीपत फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पानीपत महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. पानीपतच्या दुस•या लढाईला येत्या 14 जानेवारीला 251 वर्ष पुर्ण होत आहेत. 1761 मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामधली ही लढाई हरयाणा राज्यातल्या पानीपत या गावात झाली होती. या लढाईत मराठ्यांचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची दखल इतिहासाला घ्यावीच लागलीय. याच पानीपतच्या युद्धभुमीवरुन शनिवारी शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला.

शनिवारी पानिपतच्या युध्दभुमीवर शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंघ हुड्डा हे हजर होते. ज्या गावात पानिपतची लढाई झाली त्या उग्राखेडी या गावामध्ये महाराष्ट्र हरयाणाया मैत्री द्वार कमान उभारण्यात येणार आहे, त्याचं भुमीपुजन भुपिंदरसिंघ हुड्डा यांनी केलं. तसेच पानीपतच्या रणांगण भुमीवर उभारण्यात आलेल्या स्मारकावरही त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या सोबत हरयाणाचे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर हरयानवी भाषेत वीरगितांचा कार्यक्रम सादर झाला.

पानिपतच्या युद्धभूमीवर जाणं हा एक रोमांचकारी अनुभव होता, असं गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सांगितलं. पानिपत महोत्सवाची सुरुवात गेल्या पाच वर्षांपूर्वी अजित जोशी या आयएएस अधिका-याने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close