S M L

औरंगाबादेत संभाजी सेना आणि छावाच्या कार्यकर्त्यात हाणामारी

10 जानेवारीऔरंगाबादमध्ये संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम सुरु असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी संभाजी सेना आणि छावा संघटना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यामध्ये तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे.जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज औरंगाबादेत तापडिया नाट्यगृहात संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोध करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात घुसन जोरदार घोषणाबाजी करत स्टेजकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सावध होत कार्यकर्त्यांवर झडप घातली.पण संतापलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. छावाच्या कार्यकर्त्यांनी मिर्चीची पूड उधाळून कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीत तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे. छावाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला का केला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 12:26 PM IST

औरंगाबादेत संभाजी सेना आणि छावाच्या कार्यकर्त्यात हाणामारी

10 जानेवारी

औरंगाबादमध्ये संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम सुरु असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी संभाजी सेना आणि छावा संघटना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यामध्ये तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे.जखमीना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज औरंगाबादेत तापडिया नाट्यगृहात संभाजी सेनेच्या स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोध करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात घुसन जोरदार घोषणाबाजी करत स्टेजकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सावध होत कार्यकर्त्यांवर झडप घातली.पण संतापलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. छावाच्या कार्यकर्त्यांनी मिर्चीची पूड उधाळून कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीत तीन कार्यकर्ते जखमी झाले आहे. छावाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला का केला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close