S M L

उत्तर प्रदेशात 3 फेब्रुवारीला होणार मतदान

09 जानेवारीराज्यात महापालिकांचा तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम रंगला आहे. पण निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेत थोडा बदल केला आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी 4 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता पहिल्या टप्प्यातीलं मतदान 3 फेब्रुवारीला होणार आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला मोहम्मद पैगंबरांची जयंती येत आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही तारीख बदलण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 60 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. नव्या तारखेमुळे आता मतमोजणीची तारीखही 4 मार्चऐवजी 6 मार्च करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 05:31 PM IST

उत्तर प्रदेशात 3 फेब्रुवारीला होणार मतदान

09 जानेवारी

राज्यात महापालिकांचा तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम रंगला आहे. पण निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेत थोडा बदल केला आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी 4 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता पहिल्या टप्प्यातीलं मतदान 3 फेब्रुवारीला होणार आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीला मोहम्मद पैगंबरांची जयंती येत आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही तारीख बदलण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 60 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. नव्या तारखेमुळे आता मतमोजणीची तारीखही 4 मार्चऐवजी 6 मार्च करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close