S M L

बेळगावच्या महापौर,उपमहापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल

12 जानेवारीबेळगावमधल्या टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये बेळगावच्या माजी महापौर आणि उपमहापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर म्हणजेच कर्नाटक दिनी महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळते. या काळ्या दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन महापौर आणि उपमहापौर सहभागी झाल्या होत्या. त्याविरोधात कन्नड रक्षक वेदिकेच्या एका कार्यकर्त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. महापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने पोलिसांना कारवाई आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी आज माजी महापौर मंदा बाळेकुंद्री आणि माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनाक्रम 1 नोव्हेंबर - काळा दिवस कार्यक्रमात महापौर सहभागी3 नोव्हेंबर - कर्नाटक सरकारची महापौरांना वैयक्तिक कारणे दाखवा नोटीस15 नोव्हेंबर - कर्नाटक सरकारची महापालिकेला कारणे दाखवा नोटीस30 नोव्हेंबर - महापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी वेदिकेच्या कार्यकर्त्याची कोर्टात याचिका15 डिसेंबर - बेळगाव महापालिका बरखास्त12 जानेवारीला - महापौर आणि उपमहापौरांविरोधात पोलिसांनी दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 06:15 PM IST

बेळगावच्या महापौर,उपमहापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल

12 जानेवारी

बेळगावमधल्या टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये बेळगावच्या माजी महापौर आणि उपमहापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर म्हणजेच कर्नाटक दिनी महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळते. या काळ्या दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन महापौर आणि उपमहापौर सहभागी झाल्या होत्या. त्याविरोधात कन्नड रक्षक वेदिकेच्या एका कार्यकर्त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. महापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने पोलिसांना कारवाई आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी आज माजी महापौर मंदा बाळेकुंद्री आणि माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनाक्रम 1 नोव्हेंबर - काळा दिवस कार्यक्रमात महापौर सहभागी3 नोव्हेंबर - कर्नाटक सरकारची महापौरांना वैयक्तिक कारणे दाखवा नोटीस15 नोव्हेंबर - कर्नाटक सरकारची महापालिकेला कारणे दाखवा नोटीस30 नोव्हेंबर - महापौरांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी वेदिकेच्या कार्यकर्त्याची कोर्टात याचिका15 डिसेंबर - बेळगाव महापालिका बरखास्त12 जानेवारीला - महापौर आणि उपमहापौरांविरोधात पोलिसांनी दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close