S M L

पुण्यात भाजपमधील मतभेद उघड

12 जानेवारीमुंबईप्रमाणेच पुण्यातही निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. पुण्यात युतीची घोषणा झाली नसतानाच भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांनी डोकं वर काढलं आहे. पुण्यात झालेल्या विनोद तावडेंच्या सत्काराला मुंडे गाटाच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे गडकरी आणि मुंडे गटातले मतभेद निवडणुकीच्या तोंडावर स्पष्टपणे पुढे आले आहे. योगेश गोगावले, माधुरी मिसाळ, मुक्ता टीळक, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहोळ आणि दिलीप कांबळे हे सर्व मुंडे गटातले नेते वेगवेगळी कारणं देऊन कार्यक्रमापासून दूर राहिले. तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेजवर फक्त विकास मठकरी, गिरीश बापट आणि भिमराव तापकीर यांच्यासारखे गडकरी गटाचे नेते उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2012 05:49 PM IST

पुण्यात भाजपमधील मतभेद उघड

12 जानेवारी

मुंबईप्रमाणेच पुण्यातही निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. पुण्यात युतीची घोषणा झाली नसतानाच भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांनी डोकं वर काढलं आहे. पुण्यात झालेल्या विनोद तावडेंच्या सत्काराला मुंडे गाटाच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे गडकरी आणि मुंडे गटातले मतभेद निवडणुकीच्या तोंडावर स्पष्टपणे पुढे आले आहे. योगेश गोगावले, माधुरी मिसाळ, मुक्ता टीळक, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहोळ आणि दिलीप कांबळे हे सर्व मुंडे गटातले नेते वेगवेगळी कारणं देऊन कार्यक्रमापासून दूर राहिले. तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेजवर फक्त विकास मठकरी, गिरीश बापट आणि भिमराव तापकीर यांच्यासारखे गडकरी गटाचे नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2012 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close