S M L

पानिपतच्या युध्दभूमीवर राष्ट्रपतींनी वाहिली शुरांना श्रध्दांजली

14 जानेवारीआज पानिपत युद्धाचा स्मृतीदिन युद्धभूमीवर पानिपत इथे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्मृतीदिन साजरा झाला. युद्धात जिंकणं किंवा हरणं यांच्यापेक्षाही दाखवलेलं शौर्य अत्यंत महत्त्वाचं असतं. मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात जो पराक्रम गाजवला त्याला कुठेही तोड नाही अशा शब्दात पाटील यांनी शुरांना श्रद्धांजली वाहिली. पानिपत युद्धाचा आज 251 वा स्मृतीदिन होता. या निमित्ताने पानिपत रणांगणावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षांसह हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, हरयाणाचे राज्यपाल जगन्नाथ पहाडीया आणि त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटील सुदधा हजर होते. याच निमित्ताने आज पानिपतवर पुण्याहून निघालेली मोटरसायकल स्वारांची रॅली पण पोहोचली. जवळपास 150 जण या रॅलीत सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 04:30 PM IST

पानिपतच्या युध्दभूमीवर राष्ट्रपतींनी वाहिली शुरांना श्रध्दांजली

14 जानेवारी

आज पानिपत युद्धाचा स्मृतीदिन युद्धभूमीवर पानिपत इथे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्मृतीदिन साजरा झाला. युद्धात जिंकणं किंवा हरणं यांच्यापेक्षाही दाखवलेलं शौर्य अत्यंत महत्त्वाचं असतं. मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात जो पराक्रम गाजवला त्याला कुठेही तोड नाही अशा शब्दात पाटील यांनी शुरांना श्रद्धांजली वाहिली. पानिपत युद्धाचा आज 251 वा स्मृतीदिन होता. या निमित्ताने पानिपत रणांगणावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षांसह हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, हरयाणाचे राज्यपाल जगन्नाथ पहाडीया आणि त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटील सुदधा हजर होते. याच निमित्ताने आज पानिपतवर पुण्याहून निघालेली मोटरसायकल स्वारांची रॅली पण पोहोचली. जवळपास 150 जण या रॅलीत सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close