S M L

अजित पवार घरफोडे - मुंडे

16 जानेवारीआधी माझा पुतण्या राष्ट्रवादीच्या वाटेवर गेला आता मोठा भाऊ पंडित अण्णा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे त्यांना प्रवेश करायचा असेल तर खुशाल करावा पण माझं घरं फोडण्यासाठी अजित पवार जबाबदार आहे त्यांनी सुडाचे राजकारण खेळलं आहे असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी येत्या निवडणुकीत पराभव करुनच दाखवू असा दावाही मुंडेंनी केला. गोपीनाथ मुंडे यांनी आमच्या प्राइम टाईम या कार्यक्रमात आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आधी पुतण्या धनंजय आणि नंतर भाऊ पंडित अण्णा यांनी बंड केलं. आता दोघेही राष्ट्रवादीत चालले आहेत. पण त्याहूनही धक्कादायक बाब ही आहे की मुंडेंना संपवण्यासाठी राष्ट्रवादीतले अजित पवार आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हातमिळवणी केली. तसेच घर फोडण्यासाठी मुंडेंची पत्नी जबाबदार असं पंडित अण्णा यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना गंभीर आरोप केला.आपल्या भावाच्या या आरोपाचा समाचार घेत मुंडेंनी अजित पवारांवर हल्ला चढवला. पंडित अण्णांचे आरोप बिन बुडाचे आहे त्यांचे राष्ट्रवादीच जाण्याचे अगोदरच ठरले होते. अजित पवार सत्तेवर आले तेव्हापासून बीडच्या राजकारण दखल देण्यास सुरुवात केली ते त्यांच्या पुण्यात इतक लक्ष देत नाही त्यापेक्षा जास्त लक्ष देत आहे त्यांनी माझ्या बँका बंद पाडल्यात. आमचीही लोक स्वार्थी आहे ते त्यांच्याकडे गेली अजित पवारांनी माझं घरं फोडलं आहे हे बीडची जनता सहन करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा थेट आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला. तसेच या प्रकरणात नितिन गडकरी आणि विनोद तावडे यांचा हात नाही असंही मुंडेंनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 04:52 PM IST

अजित पवार घरफोडे - मुंडे

16 जानेवारी

आधी माझा पुतण्या राष्ट्रवादीच्या वाटेवर गेला आता मोठा भाऊ पंडित अण्णा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे त्यांना प्रवेश करायचा असेल तर खुशाल करावा पण माझं घरं फोडण्यासाठी अजित पवार जबाबदार आहे त्यांनी सुडाचे राजकारण खेळलं आहे असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी येत्या निवडणुकीत पराभव करुनच दाखवू असा दावाही मुंडेंनी केला. गोपीनाथ मुंडे यांनी आमच्या प्राइम टाईम या कार्यक्रमात आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आधी पुतण्या धनंजय आणि नंतर भाऊ पंडित अण्णा यांनी बंड केलं. आता दोघेही राष्ट्रवादीत चालले आहेत. पण त्याहूनही धक्कादायक बाब ही आहे की मुंडेंना संपवण्यासाठी राष्ट्रवादीतले अजित पवार आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हातमिळवणी केली. तसेच घर फोडण्यासाठी मुंडेंची पत्नी जबाबदार असं पंडित अण्णा यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना गंभीर आरोप केला.आपल्या भावाच्या या आरोपाचा समाचार घेत मुंडेंनी अजित पवारांवर हल्ला चढवला. पंडित अण्णांचे आरोप बिन बुडाचे आहे त्यांचे राष्ट्रवादीच जाण्याचे अगोदरच ठरले होते. अजित पवार सत्तेवर आले तेव्हापासून बीडच्या राजकारण दखल देण्यास सुरुवात केली ते त्यांच्या पुण्यात इतक लक्ष देत नाही त्यापेक्षा जास्त लक्ष देत आहे त्यांनी माझ्या बँका बंद पाडल्यात. आमचीही लोक स्वार्थी आहे ते त्यांच्याकडे गेली अजित पवारांनी माझं घरं फोडलं आहे हे बीडची जनता सहन करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा थेट आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला. तसेच या प्रकरणात नितिन गडकरी आणि विनोद तावडे यांचा हात नाही असंही मुंडेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close